महाराष्ट्र सोलापूर

“…त्यामुळे भाजपने शिवसेनेशी युती केली, मात्र शिवसेनेनं त्यांची जात दाखवली”

पंढरपुर | गद्दार शिवसेनेसोबत विधानसभा निवडणुकीत युती नको, असं भाजपमधील नेत्यांचं मत होतं. मात्र देवेंद्र फडणवीस यांना सगळयाना सोबत घेऊन जायचं होतं. त्यामुळेच भाजपने शिवसेनेशी युती केली. मात्र शिवसेनेने त्यांची जात दाखवली, अशी टीका सुभाष देशमुख यांनी केली आहे.

पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या प्रचारासाठी पंढरपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सभेत सुभाष देशमुख बोलत होते. यावेळी भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनीही महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडलंय.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला दुसऱ्यांच्या लग्नात नाचायची सवय आहे, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

भाजपच्या नेत्यांवर खालच्या शब्दांत टीका कराल तर याद राखा. तुमच्यावरही तशाच पद्धतीने टीका केली जाईल, असं गोपीचंद पडळकर यांनी सांगितलंय.

महत्वाच्या बातम्या-

शुद्र राजकारण करणं योग्य नसतं पण…- शरद पवार

प्रताप सरनाईकांवरील ईडीने केलेल्या कारवाईवर शरद पवार म्हणाले…

सुसाईड नोट लिहून बेपत्ता असलेले गौतम पाषाणकर अखेर सापडले!

“…तर केंद्र सरकार महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करेल”

ईडीच्या कारवाईनंतर प्रताप सरनाईक यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या