Top News

“पवारांनी मतदान केलं तिथे भाजपचा उमेदवारच नव्हता, मग त्यांचं मत कमळाला कसं गेलं?”

ठाणे | पवारांनी मतदान केलं तिथे भाजपचा उमेदवारच नव्हता, मग त्यांचं मत कमळाला कसं गेलं? असा प्रतिप्रश्न भाजपचे नेते सुभाष देशमुख यांनी शरद पवारांना केला आहे. ते ठाण्यात बोलत होते.

घडाळ्याला जरी मतदान केलं तरी भाजपला मतं गेल्याचं मी डोळ्याने पाहिलंय, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारयांनी साताऱ्याच्या पत्रकार परिषदेत केलं होतं. यावरून समाज माध्यमात बऱ्यात उलट सुलट प्रतिक्रिया येत आहेत.

शरद पवार गेली 50 वर्ष राजकारणात आहेत. ते हुशार आहेत. सगळ्या गोष्टी त्यांना माहिती आहेत. पराभवाची चाहूल त्यांना लागलीय, असा टोलाही त्यांनी लगावला.

अगोदर म्हणायचे मशीन खराब आहे आता म्हणतायेत भाजपला मतदान जातंय… अशी वक्तव्य फक्त पराभव डोळ्यासमोर दिसतोय म्हणूनच होत आहेत, असंही त्यांनी म्हटलं.

महत्वाच्या बातम्या

-“मोदींचे काम नव्या वधुसारखे; काम कमी, बांगड्यांचा आवाजच जास्त”

-“आचारसंहितेचं कारण सांगून शेतकऱ्यांना मदत नाही मात्र अधिकाऱ्यांच्या बदल्या; गौडबंगाल काय?”

-मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राचे हक्काचे पाणी गुजरातला वळवले- मनसे

-आतिशी यांचा भाजपवर आक्षेपार्ह पोस्टर्स वाटल्याचा आरोप; दिल्लीच्या विद्यार्थीनींनी केला भाजपचा निषेध

-23 मे नंतर मी बारामतीत गुलाल उधळायला जाणार- चंद्रकांत पाटील

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या