बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाविकास आघाडीमुळं मोठा त्रास, शिवसेना सोडताना ‘हा’ नेता रडला!

नांदेड | शिवसेनेतील नाराज नेते सुभाष साबणे यांनी आज भाजपमध्ये प्रवेशाची घोषणा केली आहे. तसेच सुभाष साबणे यांना भाजपनं देगलूर बिलोली जागेसाठी उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र सुभाष साबणे यांना शिवसेना सोडताना अश्रू अनावर झाले. साबणे माध्यमांसमोर ढसाढसा रडले.

मी 1984 पासून आज इतके वर्ष मी शिवसेनेमध्ये घालवली. आज अशोक चव्हाण यांच्या एकाधिकारशाहीला कंटाळून मला शिवसेना सोडावी लागत आहे. शिवसेना सोडताना अतिशय वाईट वाटत आहे, असं साबणे म्हणाले. बाळासाहेब ठाकरे यांनी मला खूप प्रेम दिल जे मागितलं ते दिल उद्धव साहेबांनी पण खूप दिलं, असंही सुभाष साबणेंनी यावेळी बोलताना सांगितलं आहे.

शिवसेना संपवण्याचा प्रयत्न नांदेड जिल्ह्यामध्ये अशोक चव्हाण करत आहेत. उद्धव ठाकरे हे सज्जन आहेत त्यांना डावपेच माहीत नाहीत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यात मास्टर झालेली लोक आहेत. पायातपाय घालण्यात आणि राजकारणात हे पीएचडी झालेली माणसं आहेत, असं म्हणत त्यांना अशोक चव्हाणांवर निशाणा साधला आहे.

आमच्या नेत्यांचे फोटो बॅनरवर देखील लावले जात नाहीत. आणि त्यामुळे आमच्या कार्यकर्त्याने काळे झेंडे दाखवले तर त्यांना बुटासह मारण्याचा प्रयत्न झाला, असं साबणे म्हणाले. आमच्या सदस्यांना डीपीडीसी मधून निधी दिला जात नाही, असा आरोपही त्यांना केलाय.

थोडक्यात बातम्या- 

देवेंद्र फडणवीसांचा मोठा डाव; भाजपकडून शिवसेना नेत्याला विधानसभेची उमेदवारी

एनसीबीनं ताब्यात घेतल्यानंतर शाहरुखच्या मुलाचा पहिला व्हिडीओ आला समोर!

मुख्यमंत्रिपदाविषयी कुणी स्वप्न पाहायला काही हरकत नाही- देवेंद्र फडणवीस

मुंबई क्रूज ड्रग्स प्रकरणी एनसीबीकडून शाहरुख खानच्या मुलाची चौकशी सुरु

निवृत्त प्राध्यापकानं केलं असं काम, दोन वर्षात गाव झालं दुष्काळमुक्त!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More