महाराष्ट्र मुंबई

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!

मुंबई | राज्यातील शेतकऱ्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच राज्यमंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशा मागणीचं निवेदन स्वाभिमानी महिला आघाडीनं दिलं आहे. 

गेल्या दीड वर्षात दुधाचे खरेदी दर 25 रुपयांवरून 15 रुपयांवर आले असून दुग्धव्यवसाय तोट्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्येत दिवसेंदिवस वाढ झाली आहे, असं निवेदनात म्हटलं आहे.

दरम्यान, राज्य सरकारने याकडे दुर्लक्ष केलं असून आमच्या माता भगिनींना विधवा करण्याचे महापाप केलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-दूध दरवाढ आंदोलन चिघळलं; कार्यकर्त्यांकडून एसटी बसची तोडफोड

-परळीत मराठ्यांचा रात्रभर ठिय्या; अजूनही आंदोलन सुरूच

-विराट कोहलीच्या ‘त्या’ निर्णयावर व्हीव्हीएस लक्ष्मण भडकला!

-आदित्य ठाकरेंच्या येण्यानं सेना आमदार ‘प्रश्नाळू’; अजित पवारांनी काढला चिमटा

-परळीत मराठा क्रांती ठोक मोर्चाचं वादळ; मुख्यमंत्र्यांना थेट इशारा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या