बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘आधी लस घ्या मगच पगार मिळणार’; जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर लसीकरण केंद्रावर गोंधळ

लखनऊ | मागील वर्षापासून देशभर थैमान घालणाऱ्या कोरोनाच्या लाटेला थोपवण्यासाठी सरकारने कंबर कसली आहे. देशभरात लसीकरणावर भर दिला जात आहे. जानेवारीपासून चालू करण्यात आलेल्या लसीकरणासाठी भारतीय तसेच विदेशी लसीचा वापर केला जात आहे. त्यामुळे बऱ्याच लोकांचं लसीकरण झालं आहे. परंतू अद्याप काही जणांनी लस उपलब्ध असताना देखील लस घेतली नाही. अशा लोकांसाठी फिरोजाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी एक अजब निर्णय घेतला आहे.

सरकारी विभागातील ज्या अधिकाऱ्यानं किंवा कर्मचाऱ्यानं अद्याप कोरोना लस घेतली नाही, त्याला मे महिन्याचा पगार दिला जाणार नाही. जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयानंतर सर्वांचाच गोंधळ उडाला. जिल्हाधिकाऱ्यांनी लस न घेतलेल्या कर्मचाऱ्यांना पगार न देण्याचे आदेश दिल्यानं सर्वांनी लसीकरण करण्यास सुरूवात केली आहे.

जिल्ह्यात हजारोच्या संख्येनं सरकारी कर्मचारी आहेत ज्यांनी अद्याप लस घेतलेली नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी हा अजब आदेश काढला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानंतर मोठ्या संख्येनं सरकारी कर्मचारी लस घेण्यासाठी जात आहेत. लसीचं प्रमाणपत्र दाखवल्यानंतरच त्यांना पगार दिला जाणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर देखील अनेक जण लसीकरण करण्यास टाळाटाळ करत आहे. कोण इतर आजार असल्याचं सांगत आहे तर कोण प्रमाणपत्र मिळत नसल्याची कारणं देत आहेत. परंतू जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयामुळे समाजातील अनेक लोकांमध्ये जागृती होण्यास मदत होत आहे.

थोडक्यात बातम्या-

“काँग्रेसच्याच पुण्याईवर देश चालतोय, मोदी सरकारला आत्मचिंतनाची गरज”

आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याकरता ‘हा’ एकच मार्ग उरलाय- प्रकाश आंबेडकर

व्हॅलेंटाईन-डे दिवशी सुरू झालेल्या प्रेम कहाणीचा झाला अत्यंत दुर्दैवी शेवट!

केंद्राने अजित पवारांकडे दिली ‘ही’ मोठी जबाबदारी

‘दहावीची परीक्षा घेण्याचा आग्रह धरु नका, अन्यथा…’; याचिकाकर्त्याला जीवे मारण्याची धमकी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More