बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज ठाकरे-मिलिंद एकबोटे यांच्या भेटीवर भुजबळ म्हणाले…

मुंबई | हिंदू आघाडीचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. यावर राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री यांनी छगन भुजबळ यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

राज ठाकरे हे राजकारणी असल्याने त्यांना कोणालाही भेटण्याचा हक्क आहे. मात्र, आपण काय भूमिका घेत आहोत, हे कळण्याइतकी समज त्यांच्याकडे आहे. त्यांनी प्रबोधनकारांची शिकवण लक्षात ठेवावी, असं भुजबळ यांनी म्हटलं आहे.

राज ठाकरे यांनी हिंदुत्ववादी भूमिका घेणे स्वागतार्ह आहे. त्यांनी हिंदूंवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडलीच पाहिजे, असं एकबोटे यांनी सांगितलं आहे. राज ठाकरे यांच्या भेटीनंतर मिलिंद एकबोटेंनी माध्यमांशी संवाद साधला.

दरम्यान, येत्या 24 तारखेला संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त वढू बुद्रूक याठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी ते कृष्णकुंज येथे आले होते. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये काहीवेळ चर्चा झाली. राज ठाकरे आणि एकबोटे यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण आलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

‘ये तेरे बस की बात नहीं, तेरे बाप को बोल’; गणेश नाईकांच आव्हाडांना प्रत्युत्तर

पवारसाहेब काहीच गुपचूप करत नाहीत- छगन भुजबळ

महत्वाच्या बातम्या-

“घरी हातात हात दिला तरी चालेल पण बाहेर मात्र लांबूनच नमस्कार करा”

वंचितला खिंडार; माजी आमदारासह 44 पदाधिकारी करणार राष्ट्रवादीत प्रवेश?

…म्हणून अमृता फडणवीस ट्रोल होतात- अदिती तटकरे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More