बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावेला कोरोनाची लागण

मुंबई | राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. मराठी सिनेसृष्टीतंही कोरोनाने शिरकाव केला आहे. प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे याला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आहे.

सुबोध भावे याने ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे. सुबोध सोबत त्याची पत्नी मंजिरी आणि मोठा मुलगा कान्हा यांना देखील कोरोनाची बाधा झाली आहे. तर दुसरा मुलगा मल्हारला लागण झालेली नाही.

सुबोध त्याच्या ट्विटमध्ये म्हणतो, “मी,मंजिरी आणि माझा मोठा मुलगा कान्हा आम्हा तिघांनाही कोरोनाची लागण झाली आहे. आम्ही घरीच स्वतःला quarantine करून घेतले आहे. तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने उपचार घेत आहोत. तुम्ही सगळे काळजी घ्या आणि सुरक्षित रहा. गणपती बाप्पा मोरया.”

सुबोधच्या या ट्विटनंतर त्याच्या फॅन्सनी तो आणि कुटुंब बरं होण्यासाठी प्रार्थना केली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये सुबोधने सोशल मिडियावर लहान मुलांसाठी ऑनलाईन कथा सांगण्यास सुरुवात केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

पंतप्रधानांच्या ‘या’ भाषणाने केला नवा विक्रम प्रस्थापित…!

सुशांत मृत्यु प्रकरणात ईडी आज करणार या महत्त्वाच्या व्यक्तीची चौकशी, जबाबाकडे लक्ष

‘भाजपच्या घंटानादात सोशल डिस्टन्सिंगची काशी’, संजय राऊतांची टीका

आता खड्ड्यांसोबत फोटो का नाही?, आशिष शेलारांचा राष्ट्रवादीला सवाल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More