काँग्रेसला लवकरच आपली बैठक तुरुंगात घ्यावी लागेल!

पुणे | काँग्रेसला लवकरच आपली बैठक तुरुंगात घ्यावी लागेल, असा दावा भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे. आणिबाणीविरुद्ध लढल्याबद्दल पुण्यात सुब्रमण्यम स्वामींना गौरव करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

‘नॅशनल हेरॉल्ड’ प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याविरोधात न्यायालयात दाद मागितली आहे. ए. के. अँटोनी सोनिया गांधी यांना आणि प्रियांका गांधी राहुल गांधी यांना जामीन आहेत. तसेच वेगवेगळ्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात पी. चिदंबरम आणि शशी थरूर हे लवकरच तुरुंगात जातील, असं सुब्रमण्यम स्वामी यावेळी म्हणाले.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या