भाजप सरकार हिंदूना एकत्र करुन अल्पसंख्याकांमध्ये फूट पाडत आहे!

नाशिक | पूर्वीचे सरकार अल्पसंख्याकांना एकत्र करुन हिंदूमध्ये फूट पाडत असे मात्र भाजप सरकार हिंदूना एकत्र करुन अल्पसंख्याकांमध्ये फूट पाडत आहे, असं धक्कादायक वक्तव्य भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केलंय. ते नाशिकमध्ये बोलत होते.

या वक्तव्याच्या समर्थनार्थ त्यांनी मुस्लीम महिलांचं उदाहरणही दिलं. तिहेरी तलाक रद्द करण्याच्या निर्णयामुळे उत्तर प्रदेशमध्ये मुस्लीम महिलांनी भाजपला भरभरुन मतदान केलं. परिणामी 125 मुस्लीम बहुल मतदारसंघांपैकी 85 जागा भाजपला मिळाल्या, असं ते म्हणाले. 

नेहरु घराण्यातील एकानेही आजपर्यंत पास होऊन डिग्री घेतलेली नाही, असा धक्कादायक आरोपही त्यांनी केला.