मोदींमुळेच भाजप खड्ड्यात गेला!, भाजप नेत्याच्या वक्तव्याने मोठी खळबळ

Subramanian swamy | देशभरात लोकसभा निवडणुकीचा निकाल हाती आला असून महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपने 400 पारचा नारा दिला होता मात्र, भाजपचं हे स्वप्न भंगलं आहे. त्यामुळे विरोधी नेत्यांनी आता भाजपला धारेवर घेतलं आहे. दरम्यान आता भाजपच्या बड्या नेत्यांनी X वर पोस्ट शेअर करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

काय आहे प्रकरण?

भाजपला महाराष्ट्रात मोठा धक्का बसल्यानंतर भाजप नेते सुब्रमण्यम स्वामींनी (Subramanian swamy) त्यांच्या अधिकृत X अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्याची सगळीकडे एकच चर्चा सुरु आहे. सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटलं आहे की, मोदींच्या हुकुमशाही मनसिकतेमुळे भाजप खड्यात गेलं आहे ज्यातून पक्षाला बाहेर पडावं लागेल.

काय म्हणाले सुब्रमण्यम स्वामी?

सध्या सोशल मीडियावर सुब्रमण्यम स्वामी (Subramanian swamy) यांची ही पोस्ट व्हायरल होत आहे. पुढे ते म्हणाले की, भाजप कमीतकमी 220 जागा जिंकेल असा अंदाज मी वर्तावला होता, तो आता समोर आलेल्या 237 च्या जवळपास असेल. जर भाजपने माझा सल्ला ऐकला असता तर आज त्यांनी 300चा अकडा गाठला असता.

News Title : Subramanian swamy on narendra modi

महत्त्वाच्या बातम्या-

इंडिया आघाडीची नितीश कुमारांना मोठी ऑफर!

सांगलीत ठाकरे आणि भाजपला धक्का; बंडखोर विशाल पाटील यांची विजयी मोहोर

भाजपला मोठा धक्का!; अहमदनगरमध्ये निलेश लंके आघाडीवर

मोठी बातमी! पहिल्यांदाच राजकारणात उतरलेल्या कंगनाला मोठं यश; उधळला विजयी गुलाल

महाराष्ट्र लोकसभा निकाल पाहा सर्वात आधी अवघ्या एका क्लिकवर!