देश

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात भाजप नेते सुब्रमण्यम स्वामींचा अत्यंत धक्कादायक आरोप

नवी दिल्ली | भाजप नेते आणि खासदार सुब्रमण्यम स्वामी यांच्या एका ट्विटने खळबळ माजली आहे. सुशांतची हत्याच झाली असावी, असा संशय सुब्रमण्यम स्वामींनी आपल्या ट्विटमध्ये व्यक्त केला आहे.

मला असं का वाटतंय की सुशांतची हत्याच झाली आहे, असं ट्विट स्वामी यांनी केले आहे. सोबत कागदपत्रदेखील शेअर केले आहेत. या कागदपत्रांच्या माध्यमातून त्यांनी काही गोष्टींकडे लक्ष वेधलं आहे.

स्वामींनी एकूण 26 बाबी अधोरेखित केल्या आहेत. यापैकी केवळ दोन बिंदू आत्महत्या दर्शवतात. स्वामींच्या मते, सुशांतच्या रूममध्ये ज्या अ‍ॅण्टी डिप्रेशन ड्रग्स मिळाल्यात त्या होऊ शकते अन्य कुणी तिथे ठेवल्या असाव्यात. सुशांतने गळफासासाठी वापरलेल्या कापडावरही त्यांनी संशय व्यक्त केला आहे.

सुशांतच्या गळ्यावरच्या खुणा बेल्टसारख्या कुठल्याशा वस्तूच्या आहेत. सुशांत गळफास घेतला त्या दिवशी तो व्हिडीओ गेम खेळत होता असं म्हटलं जातं. पण डिप्रेशनमध्ये असलेली कुठलीही व्यक्ति असा व्हिडीओ गेम खेळू शकत नाही, असं सुब्रमण्यम स्वामी म्हणालेत.

दरम्यान, सुब्रमण्यम स्वामींनी सुशांतच्या मृत्यूप्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. याप्रकरणी त्यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याशीही चर्चा केल्याची माहिती आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

सुशांतच्या आत्महत्या प्रकरणावरून भाजपने राजकारण करू नये- सतेज पाटील

राज्यात आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ; दिवसभरात ‘इतक्या’ हजार कोरोनाबाधितांची नोंद

वाढदिवसानिमित्त सोनू सूदने केली मोठी घोषणा; 3 लाख स्थलांतरित मजुरांना देणार नोकरी

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी दिल्लीतील रूग्णालयात दाखल

सदाभाऊ खोत यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका, म्हणाले….

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या