बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘हा केवळ अर्थमंत्र्यांचा प्रॉब्लेम आहे, की…’; सुब्रमण्यम स्वामी मोदी सरकारवर बरसले

नवी दिल्ली | छोट्या बचत योजनांवरील व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेत केंद्र सरकारने बुधवारी सर्वसामान्यांना मोठा झटका दिला होता. मात्र केंद्र सरकारच्या या निर्णयावर अनेकांनी नाराजी व्यक्त करत सरकावर सडकून टीका केली. यानंतर सरकारने हा निर्णय मागे घेतला आहे.

छोट्या बचत योजनांवरील व्याजदरात कपात करण्याचा निर्णय मागे घेत असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे. निर्मला सीतारामन यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे. केंद्र सरकारच्या छोट्या बचत योजनांवरील व्याजदरात कपात होणार नाही, 2020-21 च्या अंतिम तिमाहीमध्ये जे दर होते ते यापुढेही कायम राहतील. छोट्या योजनांवरील व्याजदरात कपात करण्याचा निर्णय केंद्र सरकारने परत घेतला आहे, असं सीतारामन यांनी सांगितलं आहे. यावरून भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे.

अर्थमंत्र्यांनी निर्णय मागे घेतल्याची माहिती देताच सुब्रमण्यम स्वामी यांनी अर्थमंत्र्यांसह संपूर्ण मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी एका ट्विट रिट्विट केलं आहे.  आश्चर्य ! हा केवळ अर्थमंत्र्यांचा प्रॉब्लेम आहे की, संपूर्ण मंत्रिमंडळच असंय? असा खोचक सवाल सुब्रमण्यम स्वामी यांनी विचरला आहे.

दरम्यान, सुब्रमण्यम स्वामी केलेल्या या ट्विटवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच सुब्रमण्यम स्वामी हे नेहमी त्यांच्या रोखठोक मतांमुळे तसेच वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेंचा विषय ठरतात. तसेच ते मोदी सरकारवर टीका करतानाही दिसतात.

 

 

 

थोडक्यात बातम्या- 

बेड मिळत नसल्याने ॲाक्सिजन सिलेंडरसह आंदोलन केलेल्या रुग्णांचा मृत्यू

सह्याद्रीतील नव्या वनस्पतीला शरद पवार यांचे नाव!

तृप्ती देसाई यांची पीडितेसह पत्रकार परिषद, राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्यावर बलात्काराचे आरोप

पुन्हा नशिबी फरपट? लॉकडाऊनची भीती, परप्रांतिय मजुरांची घराकडे जाण्यासाठी धावपळ!

धक्कादायक! भररस्त्यात तरूण उद्योजकाची गोळ्या घालून हत्या

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More