देश

“शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे फारसं लक्ष देण्याची गरज नाही”

नवी दिल्ली | कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर गेल्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. यावर भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शेतकरी आंदोलनावर फारसं लक्ष देण्याची गरज नाही, असं सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटलं आहे. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे.

भारत आणि चीन सीमेवर दोन्ही देशांचे सैन्य समोरासमोर उभे ठाकलेले आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत एक निवेदन सादर करणं गरजेचं आहे. शेतकरी आंदोलनावर फारसं लक्ष देण्याची गरज नाही, असं सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटलं आहे.

कृषी कायदे देशभरात लागू केले जाऊ नयेत. ज्या राज्यांना कृषी कायदे करायचे आहेत, त्यांनी केंद्र सरकारकडे पत्र व्यवहार करावा, असं सुब्रमण्यम स्वामी म्हणालेत.

 

थोडक्यात बातम्या-

भाजपनं उंटावरुन शेळ्या राखणं बंद करावं- प्रणिती शिंदे

शरजील उस्मानी ही घाण उत्तर प्रदेशातून आली- संजय राऊत

शेतकरी आंदोलनावर खासदाराचं असं भाषण, जे प्रत्येकाने पाहिलंच पाहिजे!

राज्यात भाजप-शिवसेनेचं सरकार असताना संभाजीनगर का केलं नाही?- राज ठाकरे

कोण आहे ती बाई? आणि सरकार तिला उत्तर का देतंय?- राज ठाकरे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या