देश

‘जर मला मोदींकडून प्रतिसाद मिळाला नाही तर…’; सुब्रमण्यम स्वामींचा इशारा

नवी दिल्ली | सुशांत प्रकरणी आपण केलेल्या मागणीला प्रतिसाद मिळाला नाही तर जनहित याचिका दाखल करु, असं भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटलं आहे. सुब्रमण्यम स्वामी यांनी या संदर्भात ट्विट केलं आहे.

सुशांत सिंहच्या शवविच्छेदनावरुन डॉक्टर सुधीर गुप्ता यांच्या समितीने काढलेल्या निष्कर्षांची पुन्हा तपासणी करण्याची गरज असल्याच्या मागणीवर जर पंतप्रधानांनी उत्तर दिलं नाही तर माझ्याकडे जनहित याचिका दाखल करण्याचा पर्याय आहे, असं स्वामी म्हणालेत.

कलम 19 आणि 21 अंतर्गत लवकर न्याय मिळण्यासाठी आणि सुशांतचा मृत्यू कसा झाला हे जाणून घेण्याचा मला अधिकार आहे, असं सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, सुशांत प्रकरणी एम्स रुग्णालयामधील टीमने सीबीआयकडे अंतिम रिपोर्ट सोपवला आहे. या रिपोर्टमध्ये हत्येचा दावा पूर्पणणे फेटाळण्यात आला असून सुशांतने आत्महत्या केल्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

“ठाकरे सरकारला महाराष्ट्राचा बंगाल करायचा आहे”

एकनाथथ खडसेंना कोणतं मंत्रिपद मिळणार?, छगन भुजबळ म्हणाले…

“अमृता फडणवीसांबद्दल खडसेंनी अशीच वक्तव्ये केली असती तर फडणवीसांनी खपवून घेतली असती का?”

‘माझं नाव घ्याल तर याद राखा, सोडणार नाही’; अंजली दमानिया यांचा खडसेंना इशारा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या