“शिंदे-फडणवीस सरकार अनैतिक, पक्ष तोडून हे सत्तेत आलेत”

पंढरपूर | भाजपचे माजी खासदार सुब्रमण्यम स्वामी (Subramanyam Swami) आज पंढरपूर दौऱ्यावर आहेत. पंढरपूर कॉरिडोअरविरोधात त्यांनी राज्य सरकारच्या विरोधात भूमीका मांडली. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.

महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस ( Shinde- Fadanvis) सरकार अनैतिक आहे. पक्ष तोड-फोड करून हे सरकार सत्तेत आलंय, असं वक्तव्य स्वामी यांनी केलंय. यामुळे खळबळ उडालीये. सुब्रमण्यम स्वामी यांनी पक्षाला घरचा आहेर दिलाय.

सरकार फोडून नवं सरकार बनवण्याची गरज नव्हती. विरोधात बसून आघाडीची पोलखोल करायची होती. ही खिचडी होती अधिक काळ चालली नसती, असं वक्तव्य सुब्रमण्यम स्वामी यांनी केलं आहे.

पंढरपूर कोरिडोअरची गरज काय. इथे लोक वाहनांनी येत आहे. रस्ते खराब आहे. ते आधी करावं ना. पंढरपूर कॉरिडोअरची एवढी आवश्यकता का पडली. विमानतळ बनवा. लोक येतील. त्यामुळे व्यवसाय वाढेल. त्यानंतर लोकं स्वत: पंढरपूर चांगलं बनेल, असं ते म्हणालेत.

दरम्यान, भाजपचं मोदी सरकार देशातील मंदिरं स्वतःच्या अधिपत्याखाली घेत आहे, असा आरोप सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे. उत्तराखंडमधील अनेक मंदिरांचं सरकारीकरण झालं आहे, असंही त्यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या-