पत्नीला निवडून आणण्यात यश मात्र, मुलाचा पराभव

धुळे | नुकताच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकीत कोण जिंकणार याचा निर्णय लागलाय. भाजपविरोधात बंड पुकारणाऱ्या धुळे आमदार अनिल गोटेंच्या लोकसंग्राम पक्षाचा फक्त एक उमेदवार निवडून आलाय.

प्रभाग 5 ब मधून भाजप उमेदवार भारती मोरे यांचा पराभव करत हेमा गोटे यांनी विजय मिळवला आहे. पण अनिल गोटे यांना आपल्या मुलाला निवडून आणण्यात अपयश आले आहे. 

भाजपने 49 जागा मिळवत निवडणूक जिंकली आहे. भारती मोरे या अनिल गोटे यांचे विरोधक मनोज मोरे यांच्या पत्नी आहेत. 

भाजपने  धुळे महापालिका निवडणूक आपल्या नेतृत्त्वात लढावी अशी गोटेंची इच्छा होती. आपण सांगू तो उमेदवार निवडणुकीत उतरवू, अशी गोंटेंची भुमीका होती. पण मुख्यमंत्री यांनी ती अमान्य केल्यामुळे ते नाराज आहेत.

महत्वाच्या बातम्या –

-धुळे महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता; विरोधकांचा सूपडा साफ

-मराठा आरक्षणविराेधी याचिकाकर्ते अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर हल्ला 

-भाजपला सर्वात मोठा धक्का; केंद्रीय मंत्री उपेंद्र कुशवाहंचा राजीनामा

-कोल्हापुरात भाजपला झटका, महापाैरपदी राष्ट्रवादीने मारली बाजी

-अहमदनगरमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीवर,वाचा ताजे कल