बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

UPSC Result | लातूरच्या पूजा कदमने अंधत्वावर मात करत युपीएससीत मिळवलं यश

लातूर | युपीएससीनं आपला अंतीम निकाल जाहीर केला आहे. देशभरातून 752 विद्यार्थी अधिकारी होणार आहेत. आपल्या बुद्धीच्या आणि सातत्यपुर्ण अभ्यासाच्या जोरावर विद्यार्थी अधिकारी होणार आहेत. देशातील यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये सध्या पूजा कदम या ग्रामीण भागातील विद्यार्थीनीची चर्चा सर्वत्र होत आहे.

लातूर जिल्हा हा शिक्षण क्षेत्रात लातूर पॅटर्न या नावानं ओळखला जातो. लातूर जिल्ह्यातील औसा तालूक्यातील टाका गावची कन्या पूजा कदम देशात 577 व्या क्रमांकाने युपीएससी परिक्षा पास झाली आहे. पूजा कदम ही आपल्या अंधत्वावर मात करत हे यश मिळवलं आहे. पूजाला फक्त 15 टक्के दृष्टी आहे.

पुजा कदमने आपल्या अदम्य इच्छाशक्तीच्या जोरावर एवढं मोठं यश संपादन केलं आहे. पूजाने आपलं महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातील फर्ग्यूसन महाविद्यालयातून केलं आहे. पूजाने राज्यशास्त्र विषयात पदव्यूत्तर शिक्षण पुर्ण केलं आहे. पूजा कदम ही चार बहिणींमध्ये सर्वात लहान आहे.

पूजा कदमचे वडील शिक्षक आहेत. लहानपणापासूनच अभ्यासात हूशार असणाऱ्या पूजा कदमच्या या यशाने ग्रामीण भाग असणाऱ्या औसा तालूक्यात आंनदाचं वातावरण आहे. पूजा कदम हीला दृष्टी कमी असतानाही तीचं हे यश डोळे दिपावणारं आहे. परिणामी लातूर जिल्ह्याचं नाव पुन्हा एकदा देशाच्या नकाशावर झळकत आहे.

थोडक्यात बातम्या 

“सरकार चालवता येत नसेल तर खुर्च्या उबवायचं काम करु नका, राजीनामा द्या”

‘मनापासून माफी मागतो’; राजेश टोपेंनी विद्यार्थ्यांची मागितली माफी

…तरच जीएसटीच्या कक्षेत येणार पेट्रोल आणि डिझेल- निर्मला सितारामन

“पालकांनो तुमचा मुलगा मुलगी काय करते याकडे लक्ष द्या”

कोरोना कधी संपणार?; तज्ज्ञांनी दिली दिलासादायक बातमी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More