महायुती सरकारचं सुरक्षित पुण्यासाठी मोठं पाऊल, चंद्रकांत पाटलांच्या प्रयत्नांना यश

Pune | पुणे शहरातील वाढती लोकसंख्या, वाढता विस्तार आणि वाहतुकीचा ताण लक्षात घेता कायदा-सुव्यवस्था अधिक सक्षम असणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने महायुती सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

पुणे पोलिस आयुक्तालय हद्दीत सात नव्या पोलिस ठाण्यांची स्थापना करण्यात येणार असून, आंबेगाव, नांदेड सिटी, बाणेर, खराडी, वाघोली, काळेपडळ आणि फुरसुंगी या भागांचा समावेश आहे. यामुळे या निर्णयासाठी पाठपुरावा करणारे कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या प्रयत्नांना यश लाभलं आहे.

चंद्रकांत पाटलांच्या प्रयत्नांना यश

नवीन पोलिस ठाण्यांच्या निर्णयासोबतच पुणेकरांच्या सुरक्षिततेसाठी तब्बल 60 कोटी रुपयांचा निधी आणि 816 अतिरिक्त पोलिस कर्मचारीही उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे, पुणे शहरात कायदा-सुव्यवस्था मजबूत करण्यासाठी एक प्रभावी आणि ठाम पाऊल उचलण्यात आले आहे.

महायुती सरकारच्या या निर्णयामुळे पुण्यात पोलिस दलाची ताकद आणखी वाढणार आहे. यासोबतच पुणे शहरात हजारो नवीन सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत. दक्ष पोलिस अधिकारी आणि सीसीटीव्ही यंत्रणेमुळे पुणेकरांना एक सुरक्षित वातावरण मिळणार आहे. सर्वसामान्य पुणेकरांना हा निर्णय निश्चितच दिलासा देणारा ठरतो आहे. पुणेकर या निर्णयासाठी महायुतीला मनापासून धन्यवादही देत आहेत. चंद्रकांत पाटलांनी देखील महायुती सरकारचे आभार मानले आहेत.

पुण्यात कायदा-सुव्यवस्था अबाधित रहावी तसेच पोलिस यंत्रणेवरील ताण कमी व्हावा, यासाठी सात नव्या पोलिस ठाण्यांच्या निर्मितीचा निर्णय महायुती सरकारने घेतला. या निर्णयामुळे 816 पोलिसांचं अतिरिक्त बळही पुण्यासाठी उपलब्ध झालं आहे, असं ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या- 

ईडीची मोठी कारवाई! ‘या’ सोसायटीची 333 कोटींची मालमत्ता जप्त

‘गरिबांना पक्क घर देणार’; अकोल्याच्या सभेत PM मोदींची घोषणा

“अजित पवारांच्या आमदारानं शरद पवारांना नोटीस पाठवली”; नव्या आरोपांनी खळबळ

सांगली हादरली! भाजप नेत्याची भररस्त्यात कुऱ्हाडीने वार करत हत्या

नेट पॅक नसेल तरी ऑनलाईन पैसे पाठवता येणार!