बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आनंदाची बातमी! महाराष्ट्रातील ‘या’ शहरात मोनोक्लोनल अँटिबॉडीची यशस्वी ट्रिटमेंट

सोलापूर | दोन आठवड्यांपूर्वी एका कॉकटेल अँटिबॉडीज औषधाला भारतात मान्यता देण्यात आली. मोनोक्लोनल अँटिबॉडीने उपचार केल्यानंतर 12 तासांतच कोरोना रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा झाली असल्याचं समोर येत होतं. कासिरिविमॅब आणि इमदेविमॅब या मोनोक्लोनल अँटिबॉडी औषधानं कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात आले असून पहिल्या सात दिवसांतच त्यांच्यातील लक्षणं वेगानं कमी झाली आणि औषधाचा चांगला परिणाम दिसून येत आहे.

महाराष्ट्रातील सोलापूरमध्ये मोनोक्लोनल अँटिबॉडीच्या ट्रिटमेंट यशस्वी झाल्याचं समोर आलं आहे. सोलापूरातील बार्शी येथे कोरोना रुग्णांना मोनोक्लोनल अँटिबॉडीच्या ट्रिटमेंट दिल्यानंतर रुग्ण 24 तासात बरे झाल्याचा दावा डॉ. संजय अंधारे यांनी केला आहे. त्यामुळे आता कोरोना रूग्णासह डाॅक्टरांनी देखील सुटकेचा श्वास घेतला आहे. सोलापूरातील बार्शी येथील 5 कोरोना रुग्णांवर या उपचार पद्धतींचा अवलंब करण्यात आला. त्यातील 4 रुग्णांवर ही ट्रिटमेंट अत्यंत प्रभावी ठरली आहे.

मधुमेह, लठ्ठपणा, हायपर टेन्शन असे आजार असलेल्या रुग्णांवर देखील मोनोक्लोनल अँटिबॉडीच्या ट्रिटमेंटचा प्रयोग केला. त्यांच्यावर देखील हा प्रयोग यशस्वी झालेला दिसत आहे. मोनोक्लोनल अँटिबॉडीच्या ट्रिटमेंटमध्ये वापरण्यात येणाऱ्या इंजेक्शनची किंंमत 60 हजार आहे. पण रूग्ण लवकर नीट होण्याची शक्यता जास्त आहे.

दरम्यान, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना देखील मोनोक्लोनल अँटिबॉडी ट्रिटमेंट थेरपी देण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली. त्यानंतर 4 महिन्यांनी भारतात याची मान्यता देण्यात आली. आता या थेरपीमुळे कोरोना झाला तरी उपचार लवकर होणार आहे. पण भारतात आढळून आलेला डेल्टा व्हेरिएंटचं म्युटेशनवर ही थेरपी काम करत नसल्याचं सांगण्यात येत आहे, यावर देखील सध्या प्रयोग केले जात आहे.

थोडक्यात बातम्या-

“…म्हणून मुस्लिम समाजातील लोक कोरोना लस घेण्यास टाळाटाळ करत आहेत”

एकनाथ शिंदे यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या मराठी अभिनेत्याला अटक

“राममंदिर ही भाजपची खासगी मालमत्ता नाही, आम्हीही राममंदिरासाठी विटा दिल्या आहेत”

तब्बल वर्षभरानंतर कोरोनाचं हाॅटस्पाॅट बनलेल्या ‘या’ जिल्ह्यात सर्वात कमी कोरोनाबाधितांची नोंद

मुंबईत सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू होणार का?, विजय वडेट्टीवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More