बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधानांना देण्यात आलेली वागणूक योग्य नाही- राजनाथ सिंग

नवी दिल्ली | यास चक्रीवादळाचा फटका बसलेल्या पश्चिम बंगालमधील नुकसानीची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी पाहणी केली. त्यानंतर त्यांनी नुकसानीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. मात्र या बैठकीसाठी त्यांना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची तब्बल अर्धा तास वाट पहावी लागली.

मिटिंगमध्ये आल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी लगेच केंद्राच्या अधिकाऱ्यांकडे चक्रीवादळामुळे झालेल्या 20 हजार कोटींच्या नुकसानीचा रिपोर्ट दिला. त्यानंतर दुसऱ्या मिटिंगला जायचं सांगून त्या मिटिंगमधून निघून गेल्या. ममता बॅनर्जी यांच्या या वर्तणुकीनंतर आता त्यांच्यावर टीका होण्यास सुरुवात झाली आहे.

या घटनेवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आजची घटना स्तब्ध करणारी आहे. मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान या व्यक्ती नाहीत, तर त्या संस्था आहेत. दोघेही जनसेवेचा संकल्प आणि संविधानाच्या प्रती निष्ठेची शपथ घेऊन दायित्वाचं वहन करतात. आपत्तीच्या काळात मदतीचा हात देण्यासाठी पंतप्रधान बंगालमध्ये आले. मात्र, त्यांना देण्यात आलेली वागणूक योग्य नाही. त्रासदायक आहे, असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, या घटनेवर राज्यपाल धनखड यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. संघर्षाचा हा पवित्रा राज्य आणि लोकशाहीच्या हिताचा नाही. मुख्यमंत्री आणि अधिकाऱ्यांचं बैठकीत भाग न घेणं संवैधानिकता वा कायद्याच्या शासनानुरुप नाही, असं ट्विट धनखड यांनी केलं आहे.

 

 

थोडक्यात बातम्या- 

मोदींना ममता बॅनर्जींनी अर्धा तास वाट पाहायला लावली; नुकसानीचा अहवाल दिला अन्…

GST परिषदेच्या बैठकीत मोठा निर्णय! 31 ऑगस्टपर्यंत या वस्तूंवर आयात शुल्क माफ

DNB मेडिसीन परीक्षेत औरंगाबादमधील विद्यार्थ्याचं दैदीप्यमान यश!

कोरोना काळात अहोरात्र मेहनत घेणाऱ्या डाॅक्टर्सला व्हिडीओच्या माध्यमातून ‘मनापासून साॅरी’, पाहा व्हिडीओ

सेल्फीसाठी काहीही! आवडत्या अभिनेत्यासोबत फोटो काढण्यासाठी महिलेने मारले चक्क साडीतच पुशअप्स, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More