बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘घटनेचे रखवालदार म्हणवून घेणारेच असे दुटप्पीपणे वागत असतील तर…’, शिवसेनेचा घणाघात

मुंबई | घटनेचे रखवालदार म्हणवून घेणारेच असे दुटप्पीपणे वागत असतील तर अपात्र विधानसभा सदस्यच काय, बाहेरचे सोमेगोमे आत आणून विधिमंडळात कोणतेही ठराव व निवडणूक हे लोक जिंकू शकतात, असा थेट आरोप राज्यपालांवर सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आला आहे.

महाराष्ट्रातले ठाकरे सरकार गेल्याचा आनंद आपले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना झाला. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद कसा, तर क्रांतिवीर भगतसिंगास लाहोरच्या मध्यवर्ती तुरुंगात ब्रिटिशांनी फाशी दिली त्यावेळी ब्रिटिशांना जो आनंद झाला असेल तसा होता, अशी तुलना शिवसेनेनं केली आहे.

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यापासून महाराष्ट्रात कायद्याचे राज्य राहिलेले नाही .महाराष्ट्रात असे वर्तन व राजकारण कधीच घडले नव्हते. बाळासाहेब ठाकरे यांच्या शपथा घेऊन हे पाप कोणी करत असेल तर भारतमाता त्यांना माफ करणार नाही, असा टोला शिवसेनेनं सामनातून बंडखोर आमदारांना लगावला आहे.

दरम्यान, शिवसेनेत असताना काय ते तेज, काय तो रुबाब, काय ती हिंमत, काय तो सन्मान, काय तो स्वाभिमान असे बरेच काही होते. तसे काही चित्र आता दिसले नाही. विधानसभा अध्यक्षीय निवडणूसाठी जात असताना बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळय़ास अभिवादन करून निष्ठेचे नाटक केले पण या सगळय़ांचे चेहरे साफ पडलेले दिसत होते, असा टोला देखील शिवसेनेनं लगावला आहे.

थोडक्यात बातम्या

“फडणवीस मुख्यमंत्री झाले नाहीत म्हणून गिरीश महाजन अजूनही फेट्याने डोळे पुसतायेत”

‘केसरकर काय चांगले प्रवक्ते झाले, आम्ही शिकवलेलं वाया गेलं नाही’; सभागृहात अजित पवारांची जोरदार फटकेबाजी

‘अडीच वर्षे ऐकलं नाही आतातरी…’; जयंत पाटलांचा राज्यपालांना खोचक टोला

शिवाजीराव आढळराव पाटील शिवसेनेतच; खासदार विनायक राऊतांनी केला खुलासा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More