गर्लफ्रेंड बूबासाठी केलेल्या ‘या’ गोष्टीमुळे स्टॅन चर्चेत

मुंबई | बिग बाॅस 16 चं (Bigg Boss 16) ग्रॅंड फिनाले पार पडलं. या सीझनचा विजेता एमसी स्टॅन(MC Stan) ठरला. त्यामुळं सध्या सोशल मीडियावर एमसी स्टॅनची जोरदार चर्चा रंगली आहे. यातच पुन्हा स्टॅननं एक इतिहास रचला आहे. यामुळे सध्या त्याची प्रचंड चर्चा सुरु आहे.

स्पर्धा जिंकल्यानंतर स्टॅनची सगळीकडेच चर्चा सुरु आहे. सलमान खानसोबत(Salman Khan) एमसी स्टॅनच्या बिग बाॅस 16 च्या विजेत्या पोस्टला रेकाॅर्डब्रेक लाईक्स मिळाले आहेत. त्यामुळं लोकप्रियतेच्या बाबतीत, स्टॅननं विराट कोहलीच्या अलीकडील पोस्टला देखील मागं टाकलं होतं.

बिग बाॅस दरम्यान, आणखी एका गोष्टीमुळं स्टॅन चर्चेत आला होता ते म्हणजे त्यांची गर्लंफ्रेंड बूबामुळं (Girlfriend Buba) होय. स्टॅन त्याच्या लव्हलाईफमुळं चर्चेत होता. स्टॅन बूबाला पाहताक्षणी तिच्या प्रेमात पडला होता. तो त्यावेळी एका नात्यात होता. ते नातं त्यानं बूबासाठी तोडलं असं त्यानं स्वत: सांगितलं आहे.

स्टॅननं थेट 40 लोकांना घेऊन बूबाच्या घरी जाऊन तिला लग्नाची मागणी (Demand for marriage) घातली होती. त्यानंतर घरच्यांशी बोलणी झाल्यावर त्याचं आणि बूबाचं नातं फिक्स करण्यात आलं होतं. स्टॅन आता बूबाशीच लग्न करणार असल्याचं त्यानं ठामपणे सांगितलं आहे.

दरम्यान, स्टॅनची गर्लेफ्रेंड अर्थात त्याची होणारी बायको बूबा 24 वर्षाची आहे. ती दिसायला खूप सुंदर आहे. तिच नाव अनम शेख असं आहे. अनेकदा बिग बाॅसमध्ये बूबा आपले कपडे स्टॅनला पाठवायची. ग्रँड फिनालयमध्ये (Grand Finale) देखील सलमाननं बूबाचा टाॅप स्टॅनला दिला होता.

महत्त्वाच्या बातम्या