Sudarshan Ghule l बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या केल्याची घटना 9 डिसेंबर 2024 ला घडली होती. या घटनेनं राज्यभरात प्रचंड खळबळ उडाली आहे. मात्र देशमुख यांची हत्या होऊन अनेक दिवस उलटले असले तरी देखील हे प्रकरण अजूनही चांगलंच तापलेलं दिसत आहे. या घटनेत पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे, मात्र एक जण अद्यापही फरार आहे. अशातच आता या हत्या प्रकरणी एक खळबळजनक माहिती समोर आली आहे.
आरोपींना फाशीची शिक्षा द्या :
सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी राज्यातील विविध भागात आक्रोश मोर्चे काढले जात आहेत. मात्र या मोर्चामध्ये सर्वपक्षीय नेत्यांसमवेत सामान्य नागरिक देखील मोठ्या संख्येनं सहभागी होत आहेत. सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात जयराम चाटे, प्रतीक घुले, महेश केदार व विष्णू चाटे यांना अटक केली. मात्र हत्येनंतर मुख्य आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे हे फरार होते.
दरम्यान, या घटनेला 22 दिवस उलटले तरी देखील आरोपी पोलीस आणि सीआयडीच्या हाती लागत नव्हते. मात्र अखेर मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला पुण्यातून अटक करण्यात आली. तर त्याच दिवशी त्यांना मदत करणाऱ्या आणखी एकाला मुंबईतून अटक करण्यात आलं आहे. मात्र अद्यापही या घटनेतील आरोपी कृष्णा आंधळे हा फरार आहे.
Sudarshan Ghule l सुदर्शन घुले अन् 3333 कनेक्शन :
संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड याच्यावर देखील आरोप होत आहेत. मात्र पुण्यातून या आरोपींना अटक करण्यापूर्वीच 31 डिसेंबरला वाल्मिक कराड सीआयडीला शरण आला. दरम्यान या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना केज न्यायालयाने 18 जानेवारीपर्यंत सीआयडी कोठडी सुनावली आहे.
मात्र आता मिळलेल्या माहितीप्रमाणे सुदर्शन घुलेची आधीपासूनच त्याच्या गावासह तालुक्यात दहशत असल्याची माहिती समोर आली आहे. कारण सुदर्शन घुले हा 3333 हा नंबर लकी मानायचा, सुधीर सांगळे याच्यासह त्याची जी गँग होती तीचं नाव देखील 3333 च असल्याची माहिती मिळाली आहे. एवढंच नाही तर घुलेने सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरणासाठी जी गाडी वापरली होती, त्या गाडीचा नंबर देखील 3333 च होता. त्यामुळे हा हत्येमागे 3333 कनेक्शन असल्याचं समजत आहे.
News Title : Sudarshan Ghule 3333 connection to the murder of Santosh Deshmukh
महत्वाच्या बातम्या –
सीआयडीच्या मोठ्या हालचाली, वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ होणार?
पुन्हा लॉकडाऊन लागणार?; धडकी भरवणारी बातमी समोर
भारतात HMPV व्हायरसची एन्ट्री होताच मार्गदर्शक सूचना जारी!
HMPV चा सर्वाधिक धोका लहान मुलांना?, देशात आतापर्यंत किती केसेस आढळल्या?
सावधान! HMPV चा पहिला रुग्ण भारतात आढळला; जाणून घ्या कशी काळजी घ्यावी