राष्ट्रवादी-शरदचंद्र पवार गटात रोहित पवार बॅकफूटवर, ‘या’ गोष्टी नडल्या?

Rohit Pawar | महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Assembly Election 2024) दोन ते तीन महिन्यावर येऊन ठेपली आहे. महाराष्ट्रातील मागील विधानसभा निवडणुका ऑक्टोबर 2019 मध्ये झाल्या होत्या. त्यामुळे नवी विधानसभा त्यापूर्वीच अस्तित्वात येण अपेक्षित आहे. राज्यातील जवळपास सर्वंच राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे.

सर्व नेते निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. या दरम्यान सर्वच पक्षातील अंतर्गतवाद हळूहळू चव्हाट्यावर येताना दिसत आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीत देखील असंच काही चित्र असल्याचं बोललं जात आहे. जयंत पाटील आणि रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यात सारं काही अलबेल नसल्याचं दिसतंय.

Rohit Pawar बॅकफूटवर

लोकसभा निवडणुकीदरम्यान प्रचंड आक्रमक रोहित पवार (Rohit Pawar) सर्वांना पाहायला मिळाले होते. मात्र महिनाभरापासून रोहित पवार (Rohit Pawar) अचानक बॅकफूटवर गेलेत. याचं कारण जयंत पाटील असल्याचं बोललं जात आहे.

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला यश मिळालं. मात्र एकट्यामुळे यश मिळालं नसल्याचं रोहित पवार अप्रत्यक्षरित्या प्रदेशाध्यक्ष असलेल्या जयंत पाटलांना म्हणाले. यानंतर त्यांनी अप्रत्यक्षपणे प्रदेशाध्यक्षपदासाठी इच्छुक असल्याचं सांगितलं. मात्र त्यांच्या या भूमिकेनंतर पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आला होता. जयंत पाटील यांची नाराजी उघडउघडपणे दिसली होती.

मी स्वतःच नमस्कार करेन- जयंत पाटील

पक्षाच्या रौप्यमहोत्सवानिमित्त झालेल्या कार्यक्रमात जयंत पाटील म्हणाले होते की, “काही लोक माझ्या अध्यक्षपदासंबंधी महिने मोजत आहेत. मात्र मला केवळ चारच महिने द्या. राज्यात सरकार आणू, त्यानंतर मी स्वतःच ‘नमस्कार’ करेन. माझ्याबद्दल काही तक्रारी असतील तर तर थेट शरद पवार यांच्या कानात सांगा. त्यांनी दोन कानशिलात दिल्या तर त्या घेऊ. उगाच जाहीर वाच्यता करू नका.

यानंतर शरद पवारांकडून रोहित पवारांनी सूचना देण्यात आल्याचं बोललं जात आहे. यानंतर  रोहित पवार अचानक बॅकफूटवर गेल्याचं पाहायला मिळतंय. गेली चार वर्षे रोहित पवार गणेशोत्सवात पुण्यातील गणेशमंडळांना भेटी देतात, विविध कार्यक्रमांना हजेरी लावतात. यंदा मात्र ते पुण्यात फिरकलेच नाहीत. तसंच संघटनेच्या कामातही ते फारसे लक्ष घालत नाहीयेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

मनोज जरांगेंचा भाजपच्या ‘या’ नेत्यावर जोरदार हल्ला!

… तर 5 कोटी मराठ्यांनी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालावा; ‘या’ नेत्याचं आवाहन

टाटा पंचला टक्कर देण्यासाठी बाजारात आली ‘ही’ इलेक्ट्रिक कार लाँच!

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! PM किसानचा 18 वा हप्ता ‘या’ दिवशी जमा होणार?

10 वी पास तरुणांसाठी सरकारी नोकरीची संधी; अर्ज कसा करणार?