बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सुशांतसिंग राजपूत पुन्हा चर्चेत! ट्विटर अचानक ट्रेंड होतंय ‘CBI CONFIRMS SSR MURDER’

मुंबई |  बाॅलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने 20 जून 2020 रोजी राहत्या घरी बांद्रा येथे आत्महत्या केली होती. सुशांतच्या निधनाने संंपुर्ण देशच हादरला होता. मात्र काहीच वेळात त्याच्या आत्महत्येनं वेगळं वळण घेतलं आणि त्याची हत्या झाल्याची बातमी समोर येऊ लागली.  त्यानंतर अनेक आरोप प्रत्यारोप होऊ लागले. त्यानंतर आता या ट्विटर पुन्हा सुशांत सिंग राजपूत यांचं नाव चर्चेत आलं आहे.

सुशांत सिंग राजपूत बाॅलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्तीसोबत प्रेम संबंधात होता. तसेच सुशांतच्या वडिलांनी रिया, तिचा भाऊ आणि आणखी सहा जणांवर सुशांतची हत्या केल्याचा आरोप लावला. हे प्रकरण आता कुठे शांत झालं होतं, अशातच पुन्हा एकदा ट्विटरवर ‘CBI CONFIRMS SSR MURDER’ हा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला.

अनेकांनी हा हॅशटॅग वापरुन सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. यासोबतच ‘CBI Custody of Pithani 4 SSR’ हा टॅग सुद्धा ट्विटरवर ट्रेंड होत आहे. सिद्धार्थ पिठानी हा सुशांतचा अगदी जवळचा आणि अनेक वर्षांपासूनचा मित्र आहे. रियाने सांगितल्याप्रमाणे ती सुशांतसोबत राहण्याआधी सिद्धार्थ सुशांतसोबत राहयचा.

दरम्यान, सुशांतच्या हत्या प्रकरणाचा पुन्हा एकदा सीबीआयने तपास करावा, अशी मागणी बिहार सरकारने केली होती. ही मागणी मान्य करण्यात आली असून आता सुशांत सिंग हत्या प्रकरणाचा पुन्हा एकदा तपास सुरु करण्यात येण्याची शक्यता आहे.

पाहा ट्विटः

थोडक्यात बातम्या-

‘काॅंग्रेसनेच दहशतवादाला जन्माला घातलं’; योगी आदित्यनाथ यांची काँग्रेसवर जहरी टीका

किरीट सोमय्या यांच्या आरोपानंतर हसन मुश्रीफ यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

हसन मुश्रीफ यांच्या कुटुंबाकडून तब्बल ‘इतक्या’ कोटींचा घोटाळा; किरीट सोमय्या यांचा गंभीर आरोप

कुंभाराने बनवलेल्या मटक्याने सर्वांचीच झाली पंचायत, आता सारं गाव…, पाहा व्हिडीओ

कोरोना काळात रक्ताचा मोठा तुटवडा, टाटा रुग्णालयाने केलं महत्त्वाचं आवाहन

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More