Sudharshan Ghule | सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी सुर्दशन घुले आणि सुधीर सांगळे या दोघांना पोलिसांनी पुण्यातील बालेवाडी येथे अटक केली आहे. संतोष देशमुख यांची हत्या झाल्यापासून सुर्दशन, सुधीर आणि कृष्णा आंधळे हे तिघे मारेकरी फरार होती.
त्यामधील दोघांना आज (04 जानेवारी) रोजी पुण्यातील बालेवाडीमधील एका खोलीतून पोलिसांनी अटक केली आहे. तर, कृष्णा आंधाळे हे अद्यापही फरार आहे. सुर्दशन आणि सुधीरला अटक केल्यानंतर या दोघांना केजमधील कोर्टात नेण्यात आलं. दरम्यान, आरोपींना 15 दिवसांची पोलीस कोठडी सुनवण्यात आली.
कोर्टात नक्की काय घडलं?
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले (Sudharshan Ghule) आणि सुधीर सांगळे यांना पुण्यातून अटक करण्यात आली, तर त्यांना मदत करणाऱ्या डॉक्टरला देखील अटक करण्यात आली. दरम्यान, या आरोपींना पोलिसांकडून केज न्यायालयात हजर करण्यात आलं होत. मात्र यावेळी केज न्यायालयाने या घटनेतील तीनही आरोपींना तब्बल 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. यावेळेस एक धक्कादायक, माहिती देण्यात आली आहे.
सीआयडीच्या एसआयटी टीमने, आरोपींना 15 दिवसांची पोलिस कोठडी देण्यात यावी अशी मागणी केली असताना, आरोपींवर काही आरोप देखील करण्यात आले आहेत. हे टोळीने गुन्हे करणारे आरोपी आहेत. संघटित गुन्हे करून दहशत निर्माण करणे जिल्ह्यात नवीन उद्योगधंदे करायला आलेल्या कंपन्यांना धमकावणे हा यांचा पेशा आहे.
हत्या एन्जॉय केली?
एवढंच नाही तर, आरोपींना संतोष देशमुख यांच्या हत्येचा अजिबात पश्चाताप नाही. संतोष देशमुख यांचा खून यांनी एन्जॉय केला आहे. या आरोपींना (Sudharshan Ghule) आता आळा घालणं गरजेचं आहे, त्यामुळे तपासासाठी आरोपींना 15 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी, असा युक्तीवाद कोर्टात करण्यात आला आहे. तर दुसरीकडे आरोपींच्या कोठडीसाठी एसआयटीकडे असलेलेले मुद्दे पुरेसे नाहीत. जवळपास या गुन्ह्यातल्या सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. विष्णू चाटे यालाही आधीपासूनच अटक करण्यात आलेली आहे.
News Title : Sudharshan Ghule and others enjoyed the murder case
महत्त्वाच्या बातम्या-
सुदर्शन घुले, सुधीर सांगळेचा गेमओव्हर, केज कोर्टात झाला मोठा निर्णय!
सरपंच हत्या प्रकरणातील आरोपींना पळून जायला पैसे ‘या’ व्यक्तीने पुरवले!
संतोष देशमुखांच्या भावाला मोठा संशय; “आरोपींना आश्रय देणारा हा…”
“यांच्या बापाचा बाप आला तरी आम्ही…”; मनोज जरांगे नेमकं काय म्हणाले?
सुदर्शन घुले अन् सुधीर सांगळेच्या मागील 10 वर्षाच्या गुन्ह्यांची यादी समोर!