मुख्यमंत्र्यांकडे मंत्रीपद मागणार नाही, मात्र दिले तर सोडणार पण नाही!

सांगली | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या मंत्रीमंडळाचा विस्तार करण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे मी मुख्यमंत्र्यांकडे मंत्रीपद मागणार नाही, मात्र दिले तर सोडणार पण नाही, असं मत आमदार सुधीर गाडगीळ यांनी व्यक्त केलं आहे.

फडवणीस मंत्रीमंडळाचा अखेरचा विस्तार होण्याची चर्चा सुरु झाल्यानंतर यामध्ये सांगली जिल्ह्यातील कुणाची वर्णी लागणार याची उत्सुकता आहे. तसंच आमदार सुधीर गाडगीळ यांचेही राज्यात वजन चांगले आहे. त्यामुळे संघाचे निष्ठावान असणाऱ्या आमदार गाडगीळ यांनाही मंत्रीपदाची लॉटरी लागू शकते. 

दरम्यान, पण मंत्रीपद मागणार नाही, पण पक्षाने जबाबदारी दिल्यास टाळणार नाही, असे स्पष्ट करुन आपणही मंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याचे सूतोवाच गाडगीळांनी केले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या-

-फकीराला संसारी माणसाचं दुखणं काय माहित; अजित पवारांचा मोदींना टोला

-#MeToo चळवळीबाबत केंद्र सरकारनं घेतला सर्वात मोठा निर्णय

-दम असेल तर समोर या; शिवसेना नेत्याचं मनसे आमदाराला आव्हान!

-बलात्कार करणाऱ्यांना जिवंत जाळलं पाहिजे- काँग्रेस आमदार

-मित्र असावा तर राज ठाकरेंसारखा!

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या