मनेका गांधींना माझा राजीनामा मागण्याचा अधिकार नाही- सुधीर मुनगंटीवार

मुंबई | मनेका गांधींना माझा राजीनामा मागण्याचा अधिकार नाही, माझा राजीनामा मनेका गांधी नव्हे भाजप अध्यक्ष अमित शहा मागू शकतात, असं वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं आहे. पिंपरीमध्ये आयोजिक केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

अवनी वाघीण नरभक्षक झाली होती. त्यामुळे न्यायालयाच्या निर्देशानुसारच तिचा एन्काऊंटर करण्यात आला आहे. यामध्ये नियमांचे कोणतेही उल्लंघन झाले नाही, असं ते म्हणाले.

सत्य परेशान हो सकता है, पराजित नही’,” असा टोला ही त्यांनी मनेका गांधी यांना यावेळी लगावला आहे.

दरम्यान, अवनी वाघिणीची शिकार केल्यामुळे मुनगंटीवारांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी मनेका गांधी यांनी केली होती. 

महत्त्वाच्या बातम्या-

-वादग्रस्त जागेवर स्वतःचं मंदिर उभारावं अशी इच्छा खुद्द रामचंद्रांची नसेन!

-मराठ्यांनी 1 डिसेंबरला जल्लोषासाठी तयार रहावे- देवेंद्र फडणवीस

-ओवेसीसारख्या गद्दारांनी पाकिस्तानातून निवडणूक लढवावी!

-भारतासारख्या गरीब देशात जाऊन चूक केली; ‘या’ खेळाडूचं वादग्रस्त वक्तव्य

-जेएनयूमधील कंडोम मोजणाऱ्या भाजप आमदाराचा पत्ता कट!