बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“केवळ याच जन्मात नाही तर पुढील जन्मातही पंकजा मुंडे भाजपमध्येच राहतील”

मुंबई | मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात भाजप खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद न मिळाल्यानं प्रीतम मुंडे यांच्यासह पंकजा मुंडेही नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत. मात्र, पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत मी आणि प्रीतम मुंडे नाराज नाही, असं सांगत नाराजीच्या चर्चांना पूर्णविराम दिला होता. अशातच आता पंकजा मुंडेंच्या नाराजीवर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

माध्यमांशी बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, पक्षावर प्रेम करणारे कार्यकर्ते कधीकधी पक्षातील इतर नेत्यांच्या तुलनेत विशिष्ट नेत्यांवर थोडं जास्त प्रेम करतात. अशा काही लोकप्रतिनिधींनी आणि पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांना समजावताना पंकजा मुंडे यांनी काही शब्दांचा उल्लेख केला असेल. मात्र, त्याचा अर्थ असा होत नाही की पंकजा मुंडे नाराज आहेत.

तसेच भाजपच्या प्रमुख नेत्यांपैकी पंकजा मुंडे एक आहेत. त्या शेवटच्या श्वासापर्यंत पक्षाच्या बाहेर जाण्याचा विचार देखील करु शकत नाहीत. केवळ याच जन्मात नाही तर पुढील जन्मातही पंकजा मुंडे भाजपमध्येच राहतील, असं देखील सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी म्हटलं आहे.

दरम्यान, नाराजीच्या चर्चांवर बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या की, मी आणि प्रीतम मुंडे नाराज नाही. चुकीच्या बातम्या पेरल्या गेल्या आहेत. आम्ही कधीच मंत्रिपदाची मागणी केली नव्हती. भाजपच्या कोणत्याही निर्णयावर आम्हाला आक्षेप नाही.

थोडक्यात बातम्या – 

सकारात्मक बातमी! देशातील कोरोना आला आटोक्यात; नव्या बाधितांसह सक्रिय रूग्णसंख्येत लक्षणीय घट

आयुषमानच्या आगामी चित्रपटातील फर्स्ट लूक व्हायरल, पाहा फोटो!

मोटरमनने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे वाचला आजोबांचा जीव; थरारक व्हिडीओ व्हायरल

‘लस घ्या आणि बाहुबली व्हा’; नरेंद्र मोदींचं जनतेला आवाहन

“तुम्ही आमच्या फोनमध्ये काय वाचता हे आम्हाला माहितीये”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More