मुंंबई | माझं तिकीट कापण्यामागे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते गिरीश महाजन यांचा हात असल्याचं खळबळजनक वक्तव्य भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केलं होतं. अशातच एकनाथ खडसे भविष्यात दिल्लीत दिसतील असं वक्तव्य भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे.
एकनाथ खडसे आक्रमक नेते आहेत. त्यांच्या आक्रमकपणाचा पक्षाला फायदा होईल. खडसे हे मूळ भाजपवासी आहेत, ते कुठेही जाणार नाहीत. उलट ते भविष्यात राज्याच्या विधीमंडळात किंवा दि्ल्लीतही दिसू शकतात, असं वक्तव्य मुनगंटीवार यांनी केलंआहे.
खडसे भाजपचे मोठे नेते आहेत. भाजप विस्तारासाठी त्यांनी काम केलं आहे. मी आणि देेवेंद्र फडणवीस यांनी खडसेंच्या नेतृत्वाखाली काम केलं आहे. त्यामुळं जर खडसे नाराज असतील तर त्यांची नाराजी आम्ही दूर करू, असंही मुनगंटीवार यांनी सांगितलं आहे.
एकनाथ खडसे यांच्यासोबत आम्ही चर्चा करणार आहोत. त्याविषयी मी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशीही चर्चा केली असल्याचं मुनगंटीवार यांनी सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
चित्ररथ नाकारणे हा महाराष्ट्राच्या मातीचा अपमान आहे- रुपाली चाकणकर https://t.co/jH9JcbCjJ7 @ChakankarSpeaks @NCPspeaks #म
— थोडक्यात (@thodkyaat) January 2, 2020
अब्दुल सत्तारांचे दाऊदशी संबंध?? ‘सामना’तील ‘ती’ बातमी व्हायरल! – https://t.co/auJmPQd26s @ShivSena @uddhavthackeray #म
— थोडक्यात (@thodkyaat) January 2, 2020
महाराष्ट्राचा चित्ररथ केंद्र सरकारने नाकारल्याने संजय राऊत आक्रमक; म्हणाले… https://t.co/5YPnXRHdE9 @rautsanjay61 @BJP4Maharashtra @ShivSena @OfficeofUT #म
— थोडक्यात (@thodkyaat) January 2, 2020
Comments are closed.