बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अवनीला गोळ्या घालण्याचे आदेश सुधीर मुनगंटीवारांनी दिले नव्हते!

मुंबई | अवनी वाघिणीला गोळ्या घालण्याचे आदेश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले नव्हते तर ते आदेश प्रधान मुख्य वन संरक्षक (वन्यजीव) यांनी दिले होते. वन्यजीव संरक्षण कायदा 1972 नुसार व एनटीसीए च्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे हे आदेश देण्यात आले होते, असं वनविभागानं स्पष्ट केलं आहे. 

विशेष म्हणजे या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची मान्यता होती, असा दावा देखील वनविभागानं केला आहे. 

अवनीच्या हल्ल्यात 13 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 2 नोव्हेंबर 2018च्या रात्री वाघिणीला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न झाला, मात्र तिने वन कर्मचाऱ्यांवर हल्ला केला, त्यामुळे स्वसंरक्षणार्थ तिला गोळी घालून ठार करण्यात आले, असं वनविभागानं म्हटलं आहे. 

दरम्यान, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या प्रकरणी प्रधान मुख्य वन संरक्षकांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या-

-राम मंदिराच्या उभारणीसाठी ‘संघ दक्ष’; 25 नोव्हेंबरला पहिली हुंकार रॅली

-सोशल मीडियावर #JusticeForAvni ; सरकार आणि मुनगंटीवार आरोपीच्या पिंजऱ्यात

-राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संजय कदम यांच्यावर गुन्हा दाखल

-अयोध्येतील राम मंदिर उभारणीत सर्वात मोठा अडथळा काँग्रेसच!

-एकनाथ खडसेंना मंत्रिमंडळात का घेत नाहीत?; कार्यकर्त्यांनी दानवेंना धारेवर धरलं

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More