मुंबई | महाराष्ट्रातील वृक्षलागवड हे निव्वळ थोतांड आणि नाटक आहे, अशी बोचरी टीका अभिनेते सयाजी शिंदे यांनी राज्य सरकारवर केली होती. त्यांच्या याच टीकेला वनमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी करारा जवाब दिला आहे.
महाराष्ट्रातील वृक्ष लागवड हे नाटक असल्याचं म्हणणंच मोठं नाटक आहे, अशा शब्दात सुधीर मुनगंटीवार यांनी सयाजी शिंदेंना प्रत्युत्तर दिलं आहे. वृक्षलागवडीचा उपक्रम समजून न घेताच त्यावर भाष्य करणं चुकीचं असल्याचं मतं मुनगंटीवार यांनी व्यक्त केलं आहे.
वृक्ष लागवडीबाबत एखादी समिती नेमल्यास सयाजी शिंदे यांचीच नियुक्ती करु, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
दरवर्षी त्याच-त्याच खड्ड्यात जाऊन मंत्री झाडं लावलात. त्यांना झाडाची जात देखील माहिती नसते, असा निशाणा सयाजी शिंदेंनी सरकारवर साधला होता.
महत्वाच्या बातम्या-
-“…तर भारत बालाकोट एअर स्ट्राईकहून मोठा हल्ला पाकव्याप्त काश्मिरमध्ये करेल”
-शरद पवारांचा ‘हा’ अत्यंत विश्वासू सहकारी राष्ट्रवादीची साथ सोडण्याच्या तयारीत?
-मुख्यमंत्र्यांविरोधातील काँग्रेसची पोलखोल यात्रा ‘या’ कारणामुळे लांबणीवर
-“विरोधी पक्षातील 5 ते 6 सहा आमदार माझ्या संपर्कात; लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार”
–…नाहीतर लोकांना तुमची धुलाई करायला लावेल- नितीन गडकरी
Comments are closed.