Sudhir Mungantiwar | महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. यामुळे महाराष्ट्र कर्जबाजारी होणार असल्याच्या चर्चा आहेत. या योजनेसाठी अर्थमंत्री अजित पवारांच्या अर्थखात्याचा प्रचंड विरोध असल्याचं बोललं गेलं आहे. तरीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हट्टीने ही योजना पुढे रेटली असल्याचं बोललं जात आहे. यावरून विरोधात असलेल्या महाविकास आघाडीने राज्य सरकारवर टीका करायला सुरूवात केली आहे. याप्रकरणाला भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
लाडकी बहीण योजनेवरून सुधीर मुनगंटीवार आक्रमक
मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेमुळे महाराष्ट्र आर्थिक कर्जात बुडेल, असं काँग्रेसने टीका केली होती. यावर आता भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. सातवं वेतन जेव्हा लागू केलं, तेव्हा महाराष्ट्र राज्यावर 44 हजार कोटीचा बोजा पडला. तेव्हा राज्याचा एकही नेता कर्जबाजारी होईल असं म्हटला नाही, असा टोला सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी लगावला.
काँग्रेसवाले म्हणतात महाराष्ट्र कर्जबाजारी होईल – सुधीर मुनगंटीवार
विधानसभा निवडणुकीत राज्यात आपली सत्ता यावी, असं काँग्रेसचं स्वप्न होतं. मात्र लाडकी बहीण योजनेमुळे काँग्रेसच्या सत्तेत येण्याच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला असल्याचं ते म्हणाले आहेत. काँग्रेसवाले मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनला विरोध करत आहेत. कधी म्हणतात आम्ही कोर्टात जाऊ, कधी म्हणतात महाराष्ट्र कर्जबाजारी होईल, कधी फॉर्ममध्ये चुका शोधतात, कधी योजना बंद करू असं घाबरवतात. ज्यांना या योजनेचे पैसे नको त्यांनी हे पैसे घेऊ नये. या योजनेने काँग्रेसची झोप उडाली आहे. (Sudhir Mungantiwar)
महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदासाठी अनेक चेहरे आहेत. त्यामुळे मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर दहा केबिन करावी लागतील. जर हे सत्तेत आले तर हे आतापासून अधिकाऱ्यांना धमकी देत आहे. आम्ही आता सत्तेत येणार आहोत. लोकसभा निवडणूकीत पराभव झाला म्हणजे सर्व निवडणूकीत पराभूत होऊ असं नाही. (Sudhir Mungantiwar)
या योजनेला महिलांचा विरोध नाही. महाराष्ट्रातील गोरगरीबांचा विरोध नाही. शेतकऱ्यांचा विरोध नाही. त्यामुळे त्यांना उत्तर महाराष्ट्रातल्या भगिनींनी, विद्यार्थ्यांनी दिलं पाहिजे, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत.
News Title – Sudhir Mungantiwar Big Statement About Mukhyamantri Ladki Bahin Yojana Marathi News
महत्त्वाच्या बातम्या
सर्वसामान्यांच्या खिशाला झळ! कांदा-टोमॅटोनंतर आता बटाटा तेजीत
‘काळ आला होता पण वेळ नाही’, पुरात अडकलेल्या तरुणाला बचाव पथकाने सुखरूप काढले बाहेर
उद्धव ठाकरेंचा भाजपला दे धक्का! माजी आमदाराने बांधलं शिवबंधन
महिलांनी आपल्या जीवनात ‘या’ सहा गोष्टी कुणालाही सांगू नयेत; अन्यथा वैवाहिक जीवन..
मुंबईत पावसामुळे दाणादाण, आजही रेड अलर्ट जारी; पोलिसांकडून मुंबईकरांना महत्वाच्या सूचना