बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…त्यामुळेच संजय राऊतांनी शिवसेना संपवण्याचा विडा उचलला”

अहमदनगर | गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरण अनेर मुद्द्यांवरून तापलेलं पाहायला मिळत आहे. राणा दांपत्य ‘मातोश्री’ बाहेर हनुमान चालिसा पठण करण्यासाठी मुंबईत दाखल झाल्यानंतर राजकारण अधिकच तापलं.

राणा दांपत्याला अटक झाल्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत असताना भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी राज्य सरकारसह शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर सडकून टीका केली आहे. संजय राऊतांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही. त्यांचाच शिवसेनेवर काहीतरी राग आहे असं वाटतं. त्यामुळे त्यांनी शिवसेना संपवण्याचा विडा उचलला असेल, असा घणाघात मुनगंटीवारांनी केला आहे.

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते, ज्या दिवशी आम्ही काँग्रेससोबत जाऊ त्यादिवशी शिवसेनेचं दुकान मी बंद करेन. ते स्वप्न आता संजय राऊतांना पूर्ण करायचं असेल. साईचरणी एकच प्रार्थना करेन की त्यांचं हे स्वप्न पूर्ण होईल, असा खोचक टोला मुनगंटीवार यांनी लगावला आहे.

दरम्यान, शिर्डीतील एका कार्यक्रमात बोलताना मुनगंटीवारांनी संजय राऊतांवर टीकेची झोड उठवली. तर न्यायपालिकेवर आम्हाला पूर्ण विश्वास आहे. अपिलात राणा दांपत्याचा विजय नक्की होईल, असा विश्वास सुधीर मुनगंटीवारांनी व्यक्त केला आहे.

थोडक्यात बातम्या-

मोठी बातमी! भायखळा तुरूंगात नवनीत राणांची तब्येत खालावली

IPL 2022: कृणाल पांड्याची विकेट अन् पोलार्डचं हटके सेलिब्रेशन; पाहा व्हिडीओ

“…हा तर महाराष्ट्राचा अपमान”; जितेंद्र आव्हाड मंगेशकर कुटुंबियांवर बरसले

“राष्ट्रवादीचा जन्मच शिवसेनेला संपवण्यासाठी झालाय”

“लतादीदी मला नेहमी म्हणायच्या माणूस आपल्या वयानं नाही तर…”, नरेंद्र मोदी भावूक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More