बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अब की बार बाप-बेटे की सरकार; मुनगंटीवारांचा ठाकरे सरकारला टोला

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार निष्क्रिय आहे, असा आरोप करत भाजपने सरकारविरोधात राज्यभर आंदोलन केलं. मुंबईतील आझाद मैदनावर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. भाजपने राज्य सरकारवर सडकून टीका केली.

अब की बार बाप-बेटे की सरकार, अब की बार स्थगिती सरकार, अशी जोरदार टीका भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. आझाद मैदानवरील सभेत भाजपने राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

उद्धवजी… सरसकट कर्जमुक्तीचं वचन कधी पूर्ण करणार, असा सवाल भजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. तसेच हे सरकार तर गजनीचा बाप आहे, असा टोला सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला आहे.

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात महिलांवर अत्याचार करणारे नराधम मोकाट कसे?, असा सवालही मुनगंटीवारांनी केला आहे. राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक आणि राज्यातील महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या मुद्द्यावरुन भाजपने राज्य सरकारला धारेवर धरलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

आज वो हुए मशहूर जो काबिल न थे…- देवेंद्र फडणवीस

‘हे सरकार तर गजनीचा बाप’; मुनगंटीवारांचा ठाकरे सरकारला टोला

महत्वाच्या बातम्या-

‘समृद्धी महामार्गात मोठा घोटाळा झाला’; पृथ्वीराज चव्हाणांचे फडणवीसांवर गंभीर आरोप

वारीस की लावारीस त्याला सोडणार नाही; देवेंद्र फडणवीस आक्रमक

अमित शहांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा- सुप्रिया सुळे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More