बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘हे सरकार तर गजनीचा बाप’; मुनगंटीवारांचा ठाकरे सरकारला टोला

मुंबई | भाजपने शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यांवरून आक्रमक पवित्रा घेतला आहे. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील आझाद मैदानावर सरकार विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. फडणवीसांसह भाजपचे अनेक नेते या आंदोलनात सहभागी झालेत.

उद्धवजी… सरसकट कर्जमुक्तीचं वचन कधी पूर्ण करणार, असा सवाल भजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. तसेच हे सरकार तर गजनीचा बाप आहे, असा टोला सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला आहे.

सरकार शेतकऱ्यांशी खोटं वागतंय. 17 मंत्रिमंडळ बैठकात एकही लोकोपयोगी निर्णय घेतला नाही, असं म्हणत मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं.

दरम्यान, सरकारला जागं करण्यासाठी हे आंदोलन आहे, सरकारच्या विरोधात जो एल्गार पुकारला आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या- 

“भाजपला पाहून जुने दिवस आठवले, आमचेही घसे असेच कोरडे पडायचे”

‘मलंग’ चित्रपटामुळे वाढली दिशा-आदित्यची लोकप्रियता

महत्वाच्या बातम्या- 

शेतकऱ्यांची ‘ती’ पत्रं घेऊन विरोधी पक्ष आज राज्यपालांची भेट घेणार- देवेंद्र फडणवीस

“देवेंद्र फडणवीस आपला ‘गजणी’ झालेला दिसतोय”

…तर शेतकरी कर्जमाफीला 400 महिने लागतील- देवेंद्र फडणवीस

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More