Top News

“एक वक्ता म्हणून राष्ट्रवादीने राज ठाकरे यांचा वापर करून घेतला”

मुंबई | भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी राज ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. एक वक्ता म्हणून राष्ट्रवादीने राज ठाकरे यांचा वापर करून घेतला आणि मग मतलब निकल गया तो हम जानते नही, अशी टीका मुनगंटीवार यांनी केली आहे. ते एका मुलाखतीमध्ये बोलत होते.

राज ठाकरे यांना ना पक्ष ओळखता येतो ना माणसं ओळखता येतात. मी राज ठाकरे यांना काही सल्ला देणार नाही. मी फक्त इतकं म्हणेन की फुल देवाच्या मस्तकावर जास्त शोभून दिसतं पण या फुलानं चूक केली, अशा शब्दात सुधीर मुनगंटीवार यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला.

हातवारे करून जर मतदान झालं असतं तर हातवारे करणारे समाजात अनेक आहेत. पराभव झाल्यानंतर माणूस खचतो. पवार साहेबांचं आत्ताचं ते रुप आहे. त्यांना पराभव पचवता येत नाही, असं म्हणत मुनगंटीवार यांनी शरद पवारांवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

पवारांनी वयाच्या 27 वर्षीपासून सत्ता पाहिली आहे. आयुष्यभर लाल दिव्याची गाडी बघितली आहे. आणि आज आपल्या जवळची लाल रक्ताची माणसं भाजपमध्ये जाताना पाहताना त्यांचे डोळे लालबुंद होणं स्वाभाविक आहे, असंही सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या- 

 

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या