बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“वाह रे सरकार तेरा खेल, सस्ती दारू महंगा तेल”

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारवर टीका करण्याची एकही संधी राज्यातील विरोधी पक्ष भाजप सोडत नसल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच महाविकास आघाडी सरकारच्या ध्येय धोरणावरून त्यांच्यावर टीकेची झोड भाजपकडून उठवण्यात येत आहे. त्यातच ठाकरे सरकारने दारूच्या उत्पादन शुल्कात कपात करण्याचा निर्णय़ जाहीर केला आहे.

ठाकरे सरकारच्या दारू स्वस्त करण्याच्या निर्णयावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आपली प्रतिक्रीया व्यक्त करत ठाकरे सरकारवर  हल्लाबोल चढवला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयावर बोलताना, ‘वाह रे सरकार तेरा खेल, सस्ती दारू महंगा तेल’, अशा शब्दात मुनगंटीवारांनी महाविकास आघाडीवर खोचक टीका केली आहे. तसेच अशीच या सरकारची निती असल्याचं म्हटलं आहे.

पेट्रोल आणि डिझेलचे भाव कमी करायचं सोडून हे सरकार दारूचे भाव कमी करून बेवड्यांना उर्जा देण्याचं काम करतंय, असा घणाघाती हल्ला मुनगंटीवारांनी चढवला आहे. तसेच सरकारने घेतलेला दारू स्वस्त करण्याचा निर्णय हा हर्बल वनस्पतीवाले आणि क्रुझ पार्टीवाल्यांसाठी समर्पित असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलत असताना सुधीर मुनगंंटीवारांनी हे सरकार जनतेनं निवडून दिलेलं नाही, तर बेईमानीच्या आधारावर स्थापन झालं आहे, असा टोलाही लगावल्याचं यावेळी पाहायला मिळालं आहे. लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या सरकारचा निर्णय हा शेतकऱ्यांना, वंचितांना समर्पित असतो, असंही मुनगंटीवार म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या

पुण्यात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाला सुरूवात

‘या’ बड्या शिवसेना नेत्यासह विश्वास नांगरे पाटीलही किरीट सोमय्यांच्या रडारवर

अमरावती हिंसाचार घटनेवरून महिला व बालविकास मंत्र्यांनी फडणवीसांना दिला ‘हा’ सल्ला

देश कोरोनामुक्तीच्या वाटेवर, पहिल्यांदाच कोरोनामुक्तीच्या दराने गाठला उच्चांक

‘शांततापुर्ण वातावरणातील आंदोलन सरकार दडपत असेल तर…’, दरेकरांचा गंभीर इशारा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More