Top News नागपूर महाराष्ट्र

“संजय राठोड वनमंत्री आहेत, ते दाट वनात संशोधन करत असतील”

Photo Credit- Facebook/Sudhir Mungantiwar,Sanjay Rathod

नागपूर | पूजा चव्हाण प्रकरणावरून विरोधकांनी ठाकरे सरकारला धारेवर धरलं आहे. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी या प्रकरणात संजय राठोडांवर खोचक टीका करत सरकारला टोला लगावला आहे.

सुधीर मुनगंटीवार नागपूरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. तेव्हा संजय राठोड हे कुठे गेले?, असा प्रश्न सुधीर मुनगंटीवार यांनी विचारलाय. संजय राठोड हे कुठे गेलेत, हे मी सांगू शकत नाही. ते वनमंत्री आहेत, ते दाट वनात संशोधन करत असतील, असा टोला सुधीर मुनगंटीवार यांनी संजय राठोडांना लगावला आहे.

आमचं राज्यपालांसोबत खुलं युद्ध आहे. हे सर्वकाही स्वार्थासाठी सुरु आहे. 12 आमदारांच्या निवडीवरुन आम्ही कोर्टात जाऊ. मात्र सरकारमध्ये तेवढी धमक नाही, असं म्हणत सुधीर मुनगंटीवारांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

दरम्यान, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणातील संशयित अरुण राठोड याला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं असल्याचं कळतंय. पुणे आयुक्तालयात त्याची चौकशी केली जाणार असल्याची माहिती आहे.

थोडक्यात बातम्या-

पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस होईल; हवामान खात्याकडून ‘या’ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

‘गाडी मेरी टू सीटर, उसमे लगा है एक मीटर’; ढिंचॅक पूजाचं नवीन गाणं रिलीझ, पाहा व्हिडीओ

“तुमच्या सोबत बसणारा मंत्री 11 दिवस झाले गायब आहे, त्याला तरी शोधा”

गजानन मारणे प्रकरणी न्यायालयात हायव्होल्टेज ड्रामा, पाहा नेमकं काय काय झालं!

“भूखंड घोटाळ्याप्रकरणी देवेंद्र फडणवीसांचीही चौकशी करा”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या