Top News महाराष्ट्र मुंबई

तुमचं डोकं फुटेल पण एक आमदार फुटणार नाही- सुधीर मुनगंटीवार

मुंबई | भाजपमध्ये दहापेक्षा जास्त आमदार नाराज असून, राष्ट्रवादीत लवकरच मेगाभरती होणार आहे, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी केला होता. यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

तुमची ताकद आहे आमची आमच्या विचारावर श्रद्धा आहे. आमच्या विचाराच्या शक्तीच्या आधारावर आमचा विश्वास आहे. भाजपचे आमदार घेण्याचा प्रयत्न करा तुमचं डोकं फुटेल पण एक आमदार फुटणार नाही, असं मुनगंटीवार म्हणाले.

महाविकास आघाडी सरकार नेहमीच तर्कशुन्य निर्णय करत असतं. आम्ही फक्त बारा आमदार पंधरा आमदार फक्त आकडेच ऐकतोय. एक आमदार यांनी अजुन घेतला नसल्याचं मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, हाताच्या दोन्ही बोटांपेक्षा जास्त सदस्य भाजपमध्ये नाराज आहेत, उबग आलेली आहे, त्यांच्यातील बऱ्याच जणांचा राष्ट्रवादीकडे येण्याचा कल आहे, लवकर निर्णय घेतला जाईल, असं जयंत पाटलांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या-

लाच स्वीकारताना महिला वाहतूक पोलीस कॅमेरात कैद, व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल

धक्कादायक! आंदोलनात सहभागी संत बाबा रामसिंगांची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या!

“पायाला भिंगरी बांधल्यासारखे शरद पवार आजही काम करत आहेत”

छगन भुजबळांच्या बोलण्याकडे आपण फारसं लक्ष देत नाही- उदयनराजे भोसले

ऑस्ट्रेलियावरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा; ‘हा’ महत्त्वाचा खेळाडू संघाबाहेर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या