महाराष्ट्र मुंबई

जनादेश डावलून स्थापन झालेलं सरकार फार काळ टिकणार नाही- सुधीर मुनगंटीवार

मुंबई | नव्या सरकारची वाटचाल ही महाराष्ट्राची वाट लावणारी आहे. महाविकासआघाडी दीर्घकाळ सत्ता चालवण्यासाठी अस्तित्वात आलेली नाही. जनादेशाच्या बाहेर जाऊन सरकार जन्माला येणारं सरकार दीर्घकाळ टिकत नाही. हे सरकारही टिकणार नाही, असं भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेने एकत्र येऊन सत्ता स्थापन केली. त्यामुळे राज्यात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपला विरोधी पक्षात बसावं लागलं. या महाविकासआघाडी सरकारच्या कामावर सुधीर मुनगंटीवार यांनी निशाणा साधला आहे.

शिवसेना आणि काँग्रेस या दोन्ही पक्षाची विचारधारा पूर्ण भिन्न आहे. एका पक्षाला मुख्यमंत्रिपद पाहिजे होते, तर बाकी दोन पक्षांना भाजपला दूर ठेवायचं होतं म्हणून त्यांनी एकत्र येत सरकार स्थापन केलं. जनादेशाच्या बाहेर जाऊन सरकार जन्माला येते ते दीर्घ काळ टिकत नाही. कर्नाटकमध्ये आपण पाहिलेच असेल, असंही मुनगंटीवार म्हणाले.

दरम्यान, सुधीर मुनगंटीवार यांच्या या टीकेला काय उत्तर दिलं जातं, हे पाहणं महत्वाचं आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या