महाराष्ट्र मुंबई

नवाब मलिक मंत्री आहेत म्हणून जावयाने काहीही करावं का?- सुधीर मुनगंटीवार

मंबई | राज्याचे अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना एनसीबीने अटक केली आहे. यावरून भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी नवाब मलिक यांच्यावर टीकास्त्र सोडलंय.

नवाब मलिक मंत्री आहेत म्हणून त्यांच्या जावयाने काहीही करावं का?, असा सवाल सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केलाय. ते मुंबईमध्ये माध्यमांशी बोलत होते.

प्रत्येक वेळी विरोधाला विरोध करायलाच हवा का? पोलिसांना कारवाई करू द्या. त्यानंतर आम्ही बघू. भाजप विरोधक म्हणून कुठेही कमी पडत नाहीये, असं मुनगंटीवार यांनी सांगितलं.

कायद्यानुसार कारवाई होत असेल, तर त्यात राजकारण कशाला आणता? आरोप गंभीर आहेत तर त्या दृष्टीने तपास करून कारवाई व्हायलाच पाहिजे, असं मुनगंटीवार म्हणालेत.

थोडक्यात बातम्या-

कृष्णा हेगडेंच्या आरोपांनंतर रेणू शर्मानं मौन सोडलं; केला मोठा खुलासा

धनंजय मुंडेच नव्हे तर ‘या’ व्यक्तिविरोधातही रेणू शर्मानं तक्रार केल्याचं उघड

धनंजय मुंडे प्रकरणात आता व्हिडीओ क्लिप्स; पीडितेच्या वकिलाचा धक्कादायक दावा

…तर माझाही धनंजय मुंडे झाला असता; ‘या’ मनसे नेत्याचा धक्कादायक गौप्यस्फोट

मनसेच्या ‘या’ नेत्यालाही रेणू शर्मांचा फोन; कृष्णा हेगडेंचा खळबळजनक दावा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या