महाराष्ट्र मुंबई

“शशिकांत शिंदेंचा शंभर कोटींचा दावा हा सर्वात मोठा राजकीय विनोद”

मुंबई | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी असताना भाजपकडून मला पक्षप्रवेशाची ऑफर देण्यात आली होती, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी केला. यावर  भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शशिकांत शिंदे यांनी केलेला दावा खोटा असल्याचं स्पष्टीकरण सुधीर मुनगंटीवार यांनी दिलं आहे. ते चंद्रपूरमध्ये बोलत होते.

शशिकांत शिंदे कोरोना नंतरचा सर्वात मोठा राजकीय विनोद करत आहेत, असा टोला सुधीर मुनगंटीवार यांनी शशिकांत शिंदेंना लगावला आहे.

मला आश्चर्य वाटतं निवडणूक लढवताना 28 लाखांपेक्षा जास्त खर्चच करता येत नाही. त्यामुळे शशिकांत शिंदे यांनी शंभर कोटींची ऑफर दिली असं सांगणं म्हणजे त्यांना याबाबत ज्ञान नाही, असा अर्थ पकडायचा. किंवा शशिकांत शिंदे कोरोना संकटानंतरचा या वर्षातला सर्वात मोठा जोक मारत आहे, असा अर्थ पकडायचा, अशी टीका मुनगंटीवार यांनी केली.

थोडक्यात बातम्या-

‘रेणू शर्मावर गुन्हा दाखल करा’; चित्रा वाघ यांनी घेतली विश्वास नांगरे पाटलांची भेट

पगार न मिळाल्याने संतापलेल्या ड्रायव्हरने एकापाठोपाठ पाच लक्झरी बसेस पेटवल्या!

‘नोटेवरील गांधींचा फोटो बदलून शिवाजी महाराजांचा लावावा’; संभाजी भिंडेंची मागणी

देशाला किमान चार राजधान्या हव्यात- ममता बॅनर्जी

26 जानेवारीपासून येरवडा कारागृहात ‘जेल-पर्यटन’ सुरु होणार- अनिल देशमुख

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या