महाराष्ट्र मुंबई

‘ऐकलं नाहीत तर याद राखा’; सुधीर मुनगंटीवारांचा ठाकरे सरकारला इशारा

Photo Credit- Facebook/ Uddhav Thackeray & Sudhir Mungantiwar

मुंबई | सरकारनं ऐकलं नाही तर याद राखा. विदर्भ आणि मराठवाड्यासाठी आम्ही सरकारला सोडणार नाही, असा इशारा भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिला आहे.

वेगवेगळ्या विभागांचा असमतोल विकास करायचा आणि तिजोरीवर डाका टाकायचा, सरकारमध्ये सध्या हेच सुरु असल्याचा गंभीर आरोप सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे.

सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मराठवाडा आणि विदर्भ वैधानिक विकास महामंडळाबाबत राज्यपालांशी चर्चा केली. दोन्ही वैधानिक विकास महामंडाळांचा कालावधी 30 एप्रिल 2020 ला संपला आहे. मात्र विदर्भ आणि मराठवाड्यासाठी हे महामंडळ गरजेचं आहे, असं सुधीर मुनगंटीवार म्हणालेत.

विधानसभा अध्यक्ष पदासाठी भाजपचा उमेदवार द्यायचा की नाही हे आमचे नेते ठरवतील. विरोधी पक्षाला उपाध्यक्षपद देण्याचे संकेत आहेत. ते पाळण्याविषयी सरकार काहीच बोलत नाही. एक पाऊल त्यांनी चालावं एक पाऊल विरोधी पक्षाने पुढे यावं, असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय.

थोडक्यात बातम्या-

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात संचारबंदी लागू; सर्व शाळा, महाविद्यालये बंद

काळजाचं पाणी करणारा व्हिडीओ, चालू सामन्यात खेळाडूचा मृत्यु

‘पूजा अरूण राठोड’ नावाने यवतमाळ जिल्ह्यात गर्भपाताचा प्रकार!

पुण्यात पुन्हा लाॅकडाऊन होणार का?; मुरलीधर मोहोळ म्हणाले…

बाबो! चालू मिटींगमध्ये बायकोला आवरला नाही नवऱ्याला किस करण्याचा मोह अन…; पाहा व्हिडीओ

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या