“मजबूत शिवसेना पक्षप्रमुख ते मजबूर मुख्यमंत्री, उद्धव ठाकरेंचा वर्षभराचा प्रवास”
मुंबई | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरेंना मजबूर मुख्यमंत्री, असं म्हटलं आहे.
मजबूत शिवसेना पक्षप्रमुख ते मजबूर मुख्यमंत्री, उद्धव ठाकरेंचा वर्षभराचा प्रवास झालाय, अशी टीका सुधीर मुनगंटीवारांनी केली आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
महाराष्ट्र पुरोगामी विचारावर पुढे जाणारं राज्य आहे. ऑडिओ क्लिप आहेत, त्यातील आवाज हुबेहुब आहे. खोट्या ऑडिओ क्लिप कोणी तयार करत असतील तर पोलीस विभागानं कारवाई केली पाहिजे, असंही मुनगंटीवार म्हणालेत.
जे लोक ऑडिओ क्लिप तयार करतात, त्यांच्या मुसक्या आवळा. जे लोक क्लिप पसरवणारे पकडू शकत नाहीत ते लोक आतंकवादी, दहशतवादी पकडू शकतील का? 15 हजार कोटी रुपये आपण यासाठीखर्च करतो का?, असा सवाल सुधीर मुनंगटीवार यांनी केला आहे.
थोडक्यात बातम्या-
“…तर आगामी काळात विधानसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसची सत्ता येईल”
“मुख्यमंत्री संवेदनशील, ते राठोड सारख्या घाणेरड्या माणसाला मंत्रिमंडळातून हाकलून देतील”
मोदी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, …तर पेट्रोल-डिझेलची किंमत निम्म्या होतील?
संजय राठोडांचा पाय खोलात, पूजाला दिलेल्या गिफ्टबॉक्सचे ‘हे’ धक्कादायक फोटो व्हायरल
त्यांनी गर्दी जमवली नाही, शिवसेनेच्या मंत्र्याला शिवसेनेच्याच मंत्र्याकडून क्लीनचिट!
Comments are closed.