बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“शिवसेनेचं हिंदुत्व घंटा वाजवणारं हिंदुत्व नाही, मग मित्राच्या पाठीत खंजीर खुपसणारं आहे का?”

मुंबई | शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात भाजपवर सडकून टीका केली. या टीकेला सुधीर मुनगंटीवार यांनी प्रत्युत्तर दिलंय.

शिवसेनेचं हिंदुत्व घंटा वाजवणारं हिंदुत्व नाही, मग मित्राच्या पाठीत खंजीर खुपसणारं हिंदुत्व आहे?, असा सवाल भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.

देशातील 90 टक्के राज्यांमध्ये मंदिरं, मशिदी, गुरुद्वार, चर्च उघडण्यात आले. इतर राज्यांचे मुख्यमंत्री हे बिनामताचे मुख्यमंत्री झाले का? ज्यांची मैत्री आहे त्यांनी कुणीही मित्र पक्षाशी बेईमानी करुन मुख्यमंत्रीपदाची खुर्ची प्राप्त केली नाही. इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना धार्मिक स्थळ खुली करायची की नाही हे समजत नाही. पण यांना मात्र भरपूर समजतं, असा टोला मुनगंटीवार यांनी लगावलाय.

आज तुमच्या हातात अधिकार आहे. मग अधिकारांचा उपयोग करा. शेतकरी बांधव संकटात आहे. दिलेले शब्द पूर्ण करा. विरोधकांवर टीका करुन अर्थचक्र पुढे जाणार नाही, असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

”सावरकरांचा पुळका’ असल्याचं दाखवणारे त्यांना भारतरत्न का देत नाहीत?’; राऊतांचा भाजपला सवाल

…यांना महाराष्ट्राचा ठेकेदार कुणी बनवलं?- कंगणा राणावत

“एका दिवसासाठी विसरा तुम्ही मुख्यमंत्री आहात आणि होऊन जाऊ दे एकदा”

“उद्धव ठाकरेंना सर्व आयतं मिळालं आहे… सरकार पडणार असून हे शरद पवारांनाही माहीत आहे”

‘…तर उद्धव ठाकरेंना राजीनामा द्यावा लागेल’; दिशा सालियान प्रकरणाचा धागा पकडत राणेंची मुख्यमंत्र्यांवर गंभीर टीका

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More