महाराष्ट्र मुंबई

“आदित्य ठाकरे म्हणजे आजोबांचं स्वप्न पूर्ण करणारा, वाघाचं हृदय असणारा खरा नातू”

मुंबई | औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर होणारच, असं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटलं. यानंतर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आदित्य ठाकरे यांचं कौतुक केलं आहे.

आदित्य ठाकरेंनी औरंगाबादचं नामांतर केल्यास त्यांची ऊंची तरुणांच्या मनात सह्याद्रीच्या पर्वतापेक्षा मोठी होईल, असं मुनगंटीवार यांनी म्हटलंय.

आदित्य ठाकरे यांनी नामांतर करून दाखवल्यास त्यांचं पहिलं अभिनंदन मी करेन, असं सांगतानाच आदित्य म्हणजे आजोबांचं स्वप्न पूर्ण करणारा, वाघाचं हृदय असलेला खरा नातू आहे, अशा शब्दांत त्यांचा गौरव करू, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना दूरदूरपर्यंत सत्तेचा मोह नव्हता. त्यांनीच औरंगाबादकरांना औरंगाबादचं नामांतर करण्याचं वचन दिलं होतं. आजोबांचं हे स्वप्न जर नातू पूर्ण करत असेल तर अधिवेशनाच्या पहिल्याच भाषणात मी त्यांचं मोठ्या मनाने अभिनंदन करेल, असं मुनगंटीवार म्हणालेत.

थोडक्यात बातम्या-

डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेत गुंडगिरी करून माझ्या पक्षाचं नाव खराब करत आहेत- रामदास आठवले

पालघर साधू हत्याकांड प्रकरणी अटकेतील आणखी 89 आरोपींना जामीन मंजूर

“शरद पवारांनी नैतिकता पाळावी, चौकशी होईपर्यंत मुंडेंचा राजीनामा घ्यावा”

नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांनी आधी लस टोचावी त्यानंतर मी लस टोचून घेईन- प्रकाश आंबेडकर

हे राष्ट्रवादी नसून भ्रष्टवादी आहेत- अतुल भातखळकर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या