Loading...

…त्या पक्षाची लायकी नाही; सुधीर मुनगंटीवार आक्रमक

मुंबई | भाजप आमच्या आमदारांना अमिष दाखवून आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप काँग्रेस- राष्ट्रवादीमधील काही नेत्यांनी भाजपवर केला होता. मात्र भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी हा आरोप फेटाळत काँग्रेस-राष्ट्रवादीवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

भाजपकडून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कोणत्याही आमदाराला फोन केला गेला नाही, असं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं आहे. तसेच काँग्रेस-राष्ट्रवादीचा त्यांच्या आमदारांवर विश्वास नसेल तर त्या पक्षाची लायकी नाही, असा घणाघात सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे.

Loading...

काँग्रेस-राष्ट्रवादीचा कोणताही आमदार आमच्या संपर्कात नाही. ज्यांनी भाजपवर फोडाफोडीचे आरोप केलेत त्यांनी 48 तासांत पुरावे द्यावे, असंही सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, सुधीर मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा लवकरच महाराष्ट्राला गोड बातमी मिळणार असल्याचं म्हटलं आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

 

 

Loading...

 

Loading...