बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या जागी तुमची किंवा माझी बहीण असती तर?’; जळगाव वसतीगृहातील घटनेवरून मुनगंटीवार संतापले

मुंबई | जळगावमधील वसतिगृहात तरुणींना कपडे काढून नाचायला लावल्याची धक्कादायक घटना घडली. यावर भाजप नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ठाकरे सरकारवर सडकून केली आहे. या मुद्द्यावरून सभागृहात मुनगंटीवार आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं.

वसतीगृहात पोलिसांकडून मुलींना नग्न करुन नाचायला लावण्यात आले. या जागी तुमची किंवा माझी बहीण असती तर हा केवळ विचार करुन पाहा. तुम्ही गृहमंत्री असलात तरी असा प्रकार झाला असता तर तुम्ही खूनच केला असता, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

तुमच्या तळपायाची आग मस्तकात गेली पाहिजे. अशा प्रकारानंतर किती तासात संबंधितांवर कारवाई करणार, किती तासात करणार, हे सरकारने सांगायला पाहिजे. हे पाप तुम्हाला फेडावे लागेल, अशी टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली. यावर गृहमंत्री अनिल देशमुखांनी प्रतिक्रिया दिली. सध्या या प्रकरणात संबंधित लोकांचे जबाब नोंदवण्याचे काम सुरु आहे. अहवाल आल्यानंतर लगेचच कठोर कारवाई केली जाईल, असं अनिल देशमुख यांनी सांगितलं.

दरम्यान, जळगावमधील शासकीय आशादीप महिला वसतिगृहात तरुणींना कपडे काढून नृत्य करायला भाग पाडल्याचा आरोप केला जात आहे. यावरून अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी सभागृहात विरोधक आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं. या मुद्द्यावरून भाजप नेत्यांनी ठाकरे सरकारवर सडकून टीका केली.

थोडक्यात बातम्या-

‘सर्व पेट्रोल पंपांवरील मोदींचा फोटो असणारे होर्डिंग हटवा’; निवडणूक आयोगाचा आदेश

“उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे राहुल गांधी झाले आहेत”

…अन् लेकीचं शीर कापून तो थेट पोलीस ठाण्याकडे निघाला; घडलेला प्रकार पाहून पोलिसही हादरले

“मोदी सत्तेत आल्यापासून भारतातील स्वातंत्र्य कमी झालं”; ‘ग्लोबल फ्रिडम’चा अहवाल

‘कल हो ना हो’ मधील जियाला ओळखणं झालंय कठीण, पाहा आता कशी दिसते

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More