मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्ता स्थापनेनंतर पहिल्यांदाच दिल्लीत जाऊन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदींचीही भेट घेतली. त्यांच्या या भेटीवर भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला टोला लगवला आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.
उद्धव ठाकरेंच्या मार्गदर्शकांनी सांगितल असेल की तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले तर शिवसैनिकांना आनंद होईल. मग पुन्हा एकदा ‘यारी है इमान मेरा यार मेरी जिंदगी’ ही भावना तयार होईल. मग कारण नसताना काँग्रेस, राष्ट्रवादीचं ब्लड प्रेशर वाढण्याची शक्यता आहे, अशी कोपरखळी मुनगंटीवार यांनी मारली आहे.
ज्याचं प्रेशर, शुगर वाढण्याची शक्यता आहे. हे बॅलन्स करण्यासाठी तुम्ही सोनिया गांधींना भेटून घ्या. हे बॅलन्स करायला, महाराष्ट्राच्या विकासासाठी मोदींकडे मदत मागतील. सरकार टिकावं म्हणून महाशिवरात्रीला मोदींची भेट घेतील, असंही मुनगंटीवार म्हणाले आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यानंतर मुनगंटीवारांनी काँग्रेस, राष्ट्रवादीला टोला लगावला आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
राज्यातलं सरकार पाडण्यात काहीच रस नाही- रावसाहेब दानवे
“देवेंद्र फडणवीस फार काळ माजी मुख्यमंत्री राहणार नाहीत”
महत्वाच्या बातम्या-
पंतप्रधान मोदींच्या भेटीनंंतर शरद पवार-उद्धव ठाकरे आज एका मंचावर
आदित्य ठाकरेंसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून सोनिया गांधींची भेट
“आम्ही झोपेत असलो तरी सावधपणे काम केलंय ,चौकशीला आम्ही घाबरत नाही”
Comments are closed.